मेष- दिवस चांगला आहे. इतरांच्या मदतीसाठी तुम्ही पुढाकार घ्याल. नोरदार वर्गाला यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - एखाद्या खास कारणामुळं प्रवास करावा लागू शकतो. घरातील मोठ्यांची मदत होईल. मित्रपरिवाराचा सल्ला उपयोगाचा ठरेल. धनलाभ होण्याची संधी आहे. 


मिथुन- कामाचा व्याप वाढेल. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. जास्तीचं कोणतंही काम हाती घेण्यापूर्वी अडकलेली कामं पूर्ण करा. 


कर्क- एखादी शुभवार्ता कळेल. आजची धनत्रयोदशी आनंदाची बरसात करणारी ठरेल. चांगल्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 


सिंह- वाणी चांगली ठेवा. फायदा होणार आहे. मानसिक शांतता लाभेल. कोणा एका खास कारणामुळं प्रवास करावा लागू शकतो. आप्तेष्टांना भेटण्याची संधी मिळेल. 


कन्या- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमच्या कामानं प्रभाव पडेल. व्यापारी  वर्गासाठी आजचा दिवस खास आहे. अर्थार्जनात वाढ होणार आहे. 


तुळ- अविवाहितांसाठी आज विवाहप्रस्ताव येतील. कामात यश मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. दिवस शुभ आहे. 


वृश्चिक- मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्याच बळावर पुढे जाण्याचं बळ तुम्हाला मिळणार आहे. 


धनु- मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे. अनेक कामं पूर्णत्वास जातील. दिवस आनंददायी आहे. 


मकर- तुमच्या कामावर अनेकजण चकित होतील. प्रशंसेस पात्र ठराल. प्रगतीपथावर तुमची वाटचाल योग्य दिशेनं सुरु आहे. 


 


कुंभ- प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. एखादा प्रवास संभवतो. प्रगती होईल. दिवस शुभ आणि तितकाच फलदायी आहे. 


मीन- तुमच्याकडून इतरांची प्रशंसा होईल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींची भेट घडेल. धनलाभाचाही योग आहे.