मुंबई : मंगळवारचा दिवस (21 सप्टेंबर) तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने मंगळ ठरण्याची चिन्हं आहेत. कर्जमुक्त होण्याचे संकेत आहेत. नशिब तुमच्यासोबत असेल. स्वत:वर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळण्याची चिन्हं आहेत. तुमच्या राशीनुसार आजचा दिवस (Horoscope 21 September 2021) कसा असेल, जाणून घ्या. (Horoscope 21 September 2021 astrology prediction about career love and health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries) : मंगळवारी तुमचं नशिब जोरदार असणार आहे. तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. संपत्ती किंवा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कामाचा दिवस चांगला जाईल. आपल्या कामात मदत करण्यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतील.
 
वृषभ (Taurus) : सकाळची सुरुवात आनंददायी आणि चांगली होईल. कामासंदर्भातील गोष्टींमध्ये प्रगती दिसून येईल. व्यवसायासंदर्भातील समस्या मंगळवारी निकाली निघू शकतात. गुंतवणूकीबाबत सल्ले मिळतील. तडजोड करुन काम पूर्ण करुन घ्या. 


मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असेल. व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांची अडकलेली कामं तडीस जातील. कुटुंबातील सदस्याची समस्या जाणून त्याची मदत करा. अडचणींपासून मुक्ती मिळण्यासाठी आजचा दिवस आहे. 


कर्क (Cancer) : चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. कामाबाबत तुम्हाला सल्ला मिळेल. समाजात आदर सन्मान मिळेल. आर्थिक बाजू ही अपेक्षेपेक्षा अधिक भक्कम असेल. रोजागारात प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. आरोग्य उत्तम राहिल मात्र हलगर्जीपणा करु नये.     


सिंह (LEO) : स्वत:वर विश्वास असेल. काम पद्धतीशीर पूर्ण कराल. स्वप्न पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहिल. व्यवसाय आणि कामासंबधित थकलेले पैसे मिळतील. व्यवसायात फायदेशीर व्यवहार होतील. 


कन्या (Vigro) : स्वत:ला प्रोत्साहित असल्याचं जाणवेल. नव्या गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल. भाग्यावर अवलंबून न राहता मेहनतीवर लक्ष द्या. गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. कर्जमुक्त व्हाव. पाल्य शिक्षणात यशस्वी होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.  


तुळ (Libra) : तुळ राशीच्या लोकांसाठीही मंगळवार अनुकूल असेल. सकारात्मक विचार भविष्य सावरण्यात सहाय्यक ठरतीलय. आर्थिक स्थिती योग्य असेल. नवीन मित्र बनतील. घरच्यांची इच्छा समजून घ्याल.  


वृश्चिक (Scorpio) :  आवडत्या कामांसाठी उत्सुक असाल. खास व्यक्तीशीं तुमचं निकटचे नाते कायम राहील. मंगळवारी तुमचं उत्तपन्न वाढीचा योग आहे. योजना करुन काम कराल तर यशस्वी व्हाल. संपत्ती आणि मालमत्तासंदर्भात व्यवहार करताना कागदपत्र काळजीपूर्वक पाहाल.  


धनु (Sagittarius) :  तुम्हाला एखादी महत्त्वाती गोष्ट माहित होईल. भाग्य तुमच्या सोबत असेल, त्यामुळे वेळेचा सदुपयोग कराल. अचानक भयानक लाभ होईल. नवीन व्यवसाय करण्याच्या बेतात असाल, तर सावध राहा. तरुणांना नोकरी मिळू शकते.


मकर (Capricorn) : मनाचा आवाज ऐका. पुढे जाण्यासाठी आजचा शुभ दिवस आहे. जमिन-वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. पैशांचा विचारपूर्वक वापर कराल. न्यायलयीन कामातून दिलासा मिळेल. घरात शुभ कार्याबाबत योजना होतील.


कुंभ (Aquarius) : आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवे मार्ग सापडतील. जोडीदाराला विश्वासात घेऊन काम करा. उत्पन्न चांगलं होईल. आत्मविश्वास वाढेल. वर्क टु होम करणाऱ्यांवर वरिष्ठ खूश असतील.


मीन (Pisces) : व्यवहारात सकारात्मक बदल होतील. नवीन मोबाईल घेण्याचा विचार येईल. दुकानदारांनी ग्राहकांसोबत चांगल्याशी व्यवहार करावा. नोकरीत प्रमोशन होण्याची चिन्हं आहेत. तुम्ही ठरवलेल्या गोष्टींबाबत कोणाला सांगू नका.