मेष- बेरोजगारांसाठी दिवसात चांगली बातमी येऊ शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामं पूर्ण होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या बोलण्याचा इतरांवर परिणाम होईल. ऑफीसमध्ये काम खूप असेल. कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जन कराल. काळ चांगला आहे. सावध राहा. 


मिथुन- व्यवसाय आणि नोकरीमध्ये परिवाराचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला. घाईने कोणतंही काम करु नका. पैसे जपून वापरा, वायफळ खर्च होऊ शकतात. 


कर्क- अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो.


सिंह- एखाद्या व्यक्तीशी संबंध सुधारतील. आत्मविश्वासाने काम करा, पण हट्टीपणा दाखवू नका. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. 


कन्या- नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता. पुस्तकं वाचाल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल.


तूळ - ठरवलेली आणि मनात असलेली काम आता पूर्ण करा. आज तुम्हाला चांगल वाटेल. सामूहिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान असणं आवश्यक आहे. 


वृश्चिक - आजचा दिवस खास आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्यामुळे बळ मिळेल. शांत राहा. 


धनू - नोकरी, करिअर आणि पैसा या गोष्टींचा फार विचार न करता जगणं किती महत्वाचं आहे. याचा विचार कराल. हे ही दिवस जाणार आहेत. 


मकर - काही महत्वाची काम नियोजित असतील तर त्याचा विचार करा. आगामी काळात याचा फायदा होईल. जोडीदाराची साथ लाभेल. 


कुंभ - आज तुम्हाला धैर्य मिळेल. कुटुंबाकडूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. थोड्या दिवसांत हे सगळं ठिक होणार आहे. 


मीन - आपण कोणतंही काम कराल त्यामध्ये फायदा हा होणारच. कामातून पैसे मिळणार. पण काम करत राहा. या परिस्थितीत त्याचाच आधार आहे.