मुंबई : नक्षत्र आपली जागा कायम बदलत असतात. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनात कुठे आहेत हे पाहण गरजेचं आहे. सध्या देशावर कोरोना व्हायरसचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.  पाहा आजचं १२ राशींच भविष्य....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - आज कोणतंही काम टाळू नका. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. एकाग्रता हा आजचा केंद्रबिंदू असेल. नवीन कामांच प्लानिंग करा आणि नियोजनात वेळ घालवा. मन आणि मेंदू यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करा. 


वृषभ - काही नवीन संधी आगामी काळात मिळणार आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. सकारात्मक राहा हे सर्वात महत्वाचं आहे. कुटुंबासोवत वेळ घालवाल. स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वयंम शिस्त पाहा. ती अत्यंत महत्वाची भूमिका या काळात बजावणार आहे. 


मिथुन - स्वतःमध्ये संयम आणण्याची ही उत्तम वेळ आहे. कामातून नवीन काही शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याचा पुढील काळात फायदा होईल. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. 


कर्क - जुन्या कामांमधून आज फायदा होईल. देशावर आलेल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सकारात्मकता अत्यंत महत्वाची आहे. असं असताना कुटुंबियांना वेळ द्या. शांततेत दिवस घालवा. आर्थिक व्यवहारात प्रगती होणार आहे. जोडीदाराची या काळात साथ महत्वाची असेल. 


सिंह - आज भावनाप्रधान न राहता बुद्धीप्रधान राहण्याचा विचार करा. पुढे जाण्याचा, प्रगती करण्याचा काळ सुरू झाला आहे. नवीन जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार राहा. अविवाहितांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. आरोग्याची काळजी घ्या. 


कन्या - पुढे जाण्याची नवी संधी खुणावत असेल तर त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. आज कुटुंबासोबत वेळ घालवा. काही महत्वाचे निर्णय कुटुंबाने मिळून एकत्र घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. अविवाहितांसाठी अत्यंत दिवस महत्वाचा आहे. 


तूळ - कामात व्यस्त राहाल. कुटुंबात शांतता राखण्यासाठी मौन पाळा. जोडीदारासोबत रोमान्सची संधी मिळेल. आजचा एकमेकांवरील विश्वास हा आगामी काळात नातं घट्ट करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. 


वृश्र्चिक - जुनं रखडलेलं काम आज तुम्ही कराल. यामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गोष्टी विसरून पुढे प्रगतीचा विचार करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. आर्थिक स्थिती लवकरच बदलणार आहे. काळजी घ्या आणि घरीच राहा हा दिला जाणारा सल्ला तंतोतंत पाळा. 


धनू - काही खास गोष्टींकरता आज मित्रपरिवाराची मदत मिळेल. महत्वाचा विचार म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी. आज तुम्ही स्वतः स्वयंम शिस्त पाळा आणि कुटुंबाला देखील पाळ द्या. तुमच्या दिनक्रमात काही प्रमाणात बदल होईल पण याचा आगामी काळात फायदा होईल. 


मकर - आजचा दिवस चांगला असेल. समस्यांमध्ये आज गुरफटून जाल. परिस्थिती गंभीर आहे. काळजी घ्या. देशावर आलेल्या संकटाशी आपल्यालाच दोन हात करायचे आहे. याकरता स्वयंम शिस्त पाळा... 


कुंभ - काही महत्वाच्या व्यक्तींशी आज संपर्क येईल. याचा आता नाही पण आगामी काळात नक्कीच फायदा होईल. कुटुंबाची काळजी घ्या. दिवस आजचा महत्वाचा आहे. 


मीन - आजचा दिवस महत्वाचा आहे. लहान मुलांची काळजी घ्या. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहा. शांततेने सर्व गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस कुटुंबासोबत घालवा. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा.