राशीभविष्य २९ फेब्रुवारी २०२० : `या` पाच राशींच्या व्यक्तींच नशिब उजळणार
काय आहे 12 राशींच महत्व
मुंबई : नक्षत्र आपली जागा प्रत्येकवेळी बदलत असतो. या नक्षत्रांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिष विज्ञानानुसार कोणता ग्रह आपल्या कुंडलीत प्रवेश करतो यावरून आपला दिवस ठरत असतो. पाहूया १२ राशींच भविष्य
मेष - काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. आजच्या दिवशी श्रम अधिक करावे लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो पूर्णत्वाला जाऊ शकतो. कोणत्याही कामात घाई गडबड करू नका. आरोग्या संदर्भात जुनी दुखणी डोकी वर काढतील.
वृषभ - धंद्यात फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. पद वाढण्याची दाट शक्यता. सहकारी कर्मचाऱ्यांकडून मदत मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. करिअरकडे मुलांनी लक्ष द्यावं. आरोग्याची काळजी घ्यावी.
मिथुन - नक्षत्रांची स्थिती आज तुमच्यासाठी खास असणार आहे. आजचा दिवस तुम्हाला सक्रीय असणार आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील. रखडलेली काम पूर्ण होतील. काही नवीन लोकं कामासाठी जोडले जाऊ शकतात. जोडीदाराला धनलाभ होऊ शकतात.
कर्क - ऑफिसमध्ये काही लोकांना इम्प्रेस करू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार फायदेशीर ठरेल. रखडलेले पैसे पुन्हा मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची दुखणी डोकं वर काढतील.
सिंह - अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा असेल. व्यवसायात सावधान राहा. कोणत्याही गोष्टीत घाईगडबड करू नका. अर्धवट राहिलेली काम सगळी पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील.
तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल.
वृश्चिक - आर्थिक बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकून राहाल. अचानक होणारी घटना तुम्हाला आनंद देऊन जाईल. सोबतच एखादी शुभवार्ता कळेल.
धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल.
मकर- तुमचं काही बाबतीत नुकसान होईल. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल.
कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे.
मीन- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.