Horoscope 30 September : गुरुवारी 4 राशीच्या व्यक्तींना धन लाभ होण्याची शक्यता
वृषभ, तुला, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खूप चांगला
मुंबई: वृषभ, तुला, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खूप चांगला असणार आहे. धनप्राप्तीचे योग आहेत. कर्क आणि सिंह राशीसाठी दिवस चांगला राहील. बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया, गुरुवार 12 राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे.
मेष: गुरुवारचा दिवस आनंदात जाईल. तुमचे विचार दृढ होतील. आपण संभाषण कौशल्य आणि आपली चपळता वापरून आपली कार्ये पूर्ण कराल.
वृषभ: व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. नफा होईल कामाच्या ठिकाणी मोठे बदल होतील. नशीब तुमच्या सोबत असेल. मांगलिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
मिथुन: विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक सुख चांगले राहणार आहे.
कर्क: कुटुंबियांसोबत वेळ घालवणार आहात. तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते.
सिंह: कामासाठी दिवस चांगला आहे. उत्साही असाल, दिवस चांगला असेल शुभ कार्यात सहभागी व्हाल.
कन्या: हुशारीनं काम करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख राहील.
तुळ: कामात यश मिळेल आणि नफा होईल. तुमचा दिवस फारसा चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
वृश्चिक: तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होईल. नोकरीत पदोन्नती होईल. तुमचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होणार आहे.
धनु: नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. कोर्टाच्या प्रकरणातून सुटका मिळू शकते.
मकर: गुरुवारी तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी परिणाम होईल. चांगले धन लाभ होईल.
कुंभ: तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे ज्याचा फायदा होणार आहे.
मीन: तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होईल. नोकरीची परिस्थितीही चांगली राहील.