मेष - भावंडांचं, मित्रांचं सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. कामं पूर्णदेखील होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. आजचा दिवस कुटुंब, पैसे, खाजगी जीवन यातच जाईल. जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणं शक्यतो टाळा. चीडचीड होऊ शकते. सावध राहा. विचार करुन बोला. जोडीदाराशी बोलून समस्येवर मार्ग मिळवता येऊ शकतो.


मिथुन - नवीन काम हाती येऊ शकतं. दिवस चांगला आहे. नवीन संधी मिळू शकतात. विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करा. समस्या लवकरच सोडवल्या जातील. शांत राहून विचार करा.


कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करु नका. नोकरीतही घाई-गडबड करु ना. काम करताना एकाग्रतेने करा. अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. दिवस चांगला जाईल. आनंदात जाईल.


सिंह - विचार करत असलेल्या कामात अडथळे येतील. अनेक प्रकारचे विचार मनात येत राहतील. पैसे सांभाळून खर्च करा. कटू बोलू नका. कोणतीही नवी योजना आखू नका. रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.


कन्या - व्यवसायात नवीन काम सुरु होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येत चांगली राहील. धीर ठेवा. मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल.


तुळ - तुमचा आजचा दिवस चांगला आहे. कामात मन लागेल. अचानक चांगल्या घटना घडू शकतात. त्याचा फायदा करुन घ्या. अचानक झालेले बदल फायदेशीर ठरु शकतात. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. आजचा दिवस आनंदाचा आहे.


वृश्चिक - काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. नुकसानीची शक्यता आहे. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. समस्या, असुविधा वाटू शकते. समस्या असल्यास सावधानतेने मार्गी लावा.


धनु - पैशांसंबंधी टेन्शन कमी होईल. वैवाहिक जीवन सुखी राहील. धनलाभाची शक्यता आहे. मुलांकडून मदत मिळेल. तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. नोकरी, व्यवसायातील समस्या कमी होतील.


मकर - मनात अनेक विचार सुरु राहतील. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. काम पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. कामात मन लागणार नाही. व्यवसायात आज नव्या योजना शक्यतो टाळा. तब्येत चांगली राहील.


कुंभ - रागावर नियंत्रण ठेवा. पुढील योजना आखू शकता. रखडलेली कामं पूर्ण होतील. जबाबदारी वाढू शकते. बोलताना विचार करुन बोला. समोरच्या व्यक्तीचं बोलणंही समजून घ्या. 


मीन - कामात घाई करु नका. व्यवसायात टेन्शन वाढू शकतं. एखाद्या कामाचा रिझल्ट न मिळाल्यास घाबरु नका. कामाकडे लक्ष द्या. पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. नवीन कल्पनांमधून फायदा होऊ शकतो. दिवस चांगला आहे.