मुंबई : शुक्रवारी भाग्य तुमच्यासोबत असेल. तुम्ही जे जे कार्य हातात घ्याल, त्या त्या कामात यशस्वी व्हाल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. समाजात मान मिळेल. दीपावली पाडव्याचा दिवस (Horoscope 5 November 2021) कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 5 November 2021 know all zodiac predictions) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries) : दिवसाची सुरुवात प्रसन्न राहिल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांसाठी फायद्याची स्थिती आहे.  आरोग्य सामन्य राहिल.      


वृषभ (Taurus) : कार्यालयात सहकाऱ्यांशी चांगल्याने वागाल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य लाभेल. मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यात यशस्वी ठराल. कौटुंबिक सुख लाभेल. पाल्यांकडे लक्ष द्या.   


मिथुन (Gemini) : भाग्य तुमच्यासोबत असेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्याचं आयोजन होईल. त्यात तुम्ही हिरहिरीने सहभागी व्हाल. पूर्ण दिवस धमाल मस्तीत जाईल.   


कर्क (Cancer) : कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. पैसे योग्य गोष्टींवर खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील मात्र मनात भितीचं वातावरण असेल. तुम्ही जे जे कार्य हातात घ्याल, त्या त्या कामात यशस्वी व्हाल.    


सिंह (Leo)  : नशिब तुमच्यासोबत असेल. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस शुभ आहे. चारही बाजूने चांगली बातमी मिळेल. पदोन्नतीसाठी तुम्ही जीव तोडून काम कराल.   


कन्या (Virgo) : सर्वांसोबत चांगल्याने वागाल. व्यवसायात लाभदायक स्थिती असेल. समाजात सन्मान मिळेल. नोकरदारांचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. 


तुळ (Libra) : पैशांबाबत दिवस फार महत्त्वाचा असेल. आर्थिक व्यवहारासंबधी दिवस चांगला असेल. जुन्या मित्रांशी संवाद होऊ शकतो. मन प्रसन्न राहिल. दिवसभर उत्साह जाणवेल. नशिब तुमच्यासोबत आहे. 


वृश्चिक (Scorpio) : अस्वस्थता जाणवले. आरोग्याच्या समस्येमुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही. नोकरदार वर्गाला अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारी वर्गासाठी दिवस सामन्य राहिल.  


धनु (Sagittarius) : भाग्य पूर्णपणे तुमच्यासोबत नसेल मात्र न्यायलयीन कामातून दिलासा मिळेल. कार्यात यशस्वी होण्यासाठी दिवस शुभ आहे.  


मकर (Capricorn) : तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटेल. कामात कोणच्यातरी मदतीने आर्थिक फायदा होईल. कामातून आर्थिक फायदा होईल.    


कुंभ (Aquarius) :  कुटुंबियांकडे लक्ष ठेवाल तसेच त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबियासाठी तुम्ही वेळातून वेळ काढाल. त्यांच्यासह वेळ घालवाल. आर्थिक नड पूर्ण करण्यासाठी मित्र मदत करतील.  


मीन (Pisces) : संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण असेल. कुटुंबियासोबत वेळ घालवाल. आर्थिक बाजू मजबूत असेल. समाजात चांगल्या लोकांशी संपर्क तयार होईल.