राशीभविष्य- `या` राशीच्या व्यक्तींनी आज जपायला हवं आरोग्य
कसा असेल आजचा आपला दिवस? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. दिवसभरात येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना मिळाली तर त्या टाळण्याचे प्रयत्न करता येतात किंवा त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- सूर्य देवतेची उपसना करणं आज आपल्यासाठी भाग्याचं असणार आहे. गोष्टींना सुधारण्यासाठी आपल्याजवळ आज वेळ असणार आहे. आज आपल्याला तणाव येऊ शकतो.
वृषभ - आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. आज आपल्या हातात पैसा टिकणार नाही. आज आपल्याला मानसिक शांततेची आवश्यकता आहे.
मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजच्या दिवसात प्रत्येक गोष्टी सल्ला घेतला तर अधिक उत्तम. दूरदृष्टी ठेवा, मोहात अडकलात तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.
कर्क - आर्थिक नियोजन करा. आपल्या प्रत्येक योजना आणि नियोजन यशस्वी होईल अशा दिशेनं प्रयत्न करत राहा. फळ नक्की मिळेल. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते.
सिंह- खेळामध्ये आज आपलं मन रमेल. प्रिय व्यक्तीसोबत आजचा आपला दिवस छान जाईल.
कन्या- योग आणि ध्यानधारणेतून आपला दिवस उत्तम जाईल. आजचा आपला दिवस फायदेशीर असणार आहे. आज आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात.
तूळ - तणावामुळे आपल्याला आजारपण येईल. आजचा दिवस मित्र-कुटुंबियांसोबत घालवा.
वृश्चिक - आज आपण आराम करणं खूप गरजेचं आहे. आज आपले पैसे खूप जास्त खर्च होऊ शकतात.
धनु- घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आज विनाकारण आपण पैसे खर्च करणार आहात. अचानक आपल्याला पैशांची चणचण जाणवेल.
मकर - आज आपल्याला थकवा जाणवेल. आज आपल्या वागण्यामुऴे प्रिय व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्य दुखावले जाऊ शकतात.
कुंभ - आज आपल्या प्रिय व्यक्तीचा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णय खूप जास्त विचारपूर्वक घ्यायला हवा.
मीन- आज प्रिय व्यक्ती आपल्यावर नाराज होऊ शकते. आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आज आपली तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.