मुंबई : जगभरात नव्या वर्षाची धूम आहे. त्यातच वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष कसं असणार आहे. कोणत्या नवीन गोष्टी यावर्षात असणार आहे. जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशी फळ : नवीन वर्षात शनीची साडेसाती हा मोठा फॅक्टर असणार आहे. हे वर्षात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मानसिक तणावापासून लांब राहा. ऑक्टोबर महिना हा सर्वात शुभ असेल.


करिअर : नोकरी करणाऱ्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. काही ऑफर येऊ शकतात. व्यापार वाढवण्यासाठी काही वेळा प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात गुंतवणूक कराल.


कौटुंबिक जीवन : कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. काही समस्या दूर होईल. कुटुंबासोबत काही खास वेळ घालवाल. वरिष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. नवीन लोकांचा संपर्क वाढेल.


आर्थिक स्थिती : जास्त काळासाठी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. सप्टेंबरच्या आधी अडकून पडलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीसाठी गुंतवणूक करु शकता. व्यवहार करताना सावधपणे करावा लागेल.


आरोग्य : आरोग्यासाठी नवीन वर्ष चांगलं आहे. जुन्या समस्या दूर होतील. डोळे आणि घशाची समस्या होऊ शकते. जेवणाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.