Weekly Horoscope: या 2 राशीच्या व्यक्तींनी ही चूक करू नका, होऊ शकतं मोठं नुकसान
मेष, वृषभ, कर्क राशीसह काही राशींसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्तम राहील.
मुंबई: मेष, वृषभ, कर्क राशीसह काही राशींसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्तम राहील. दुसरीकडे, 2 राशीच्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते. खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरचा तिसरा आठवडा (13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021) मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर राशीसाठी आठवडा कसा आहे जाणून घेऊया.
मेष: गणेशजींच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नफ्याच्या संधी येतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. आरोग्याबाबत थोडे जागरूक राहा. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्हाला नफ्याचा आनंद मिळेल. जोडीदार आणि मुलांना सुखद सहकार्य मिळेल.
वृषभ: नशीब तुमची साथ देईल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सरकारी क्षेत्रात . तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. दीर्घ काळापासून चालणाऱ्या कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निर्णय या आठवड्यात तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे.
मिथुन: गणेशजींच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात काही मोठे काम करायचा आणि प्रवासाचा योग येईल. उत्पन्न योग्य राहील. आपण आपले सहकारी आणि मित्रांचे पूर्ण समर्थन मिळवू शकता. या आठवड्यात उच्च पदस्थ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील. कुटुंबासंदर्भात कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील.
कर्क: या आठवड्यात राजकारणात यश मिळवण्याची संधी मिळू शकते. सरकारी सेवेतील उच्चपदस्थ लोकांशी तुमची मैत्री होईल. तुम्ही परोपकारी स्वभावाचे आहात त्यामुळे तुम्ही भल्यासाठी काम कराल. या आठवड्यात तुम्हाला सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
सिंह: या आठवड्यात पैसे खर्च होणार आहेत. तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही प्रत्येक कार्य सोप्या पद्धतीनं करू शकता. या आठवड्यात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल.
कन्या: धन आणि संपत्ती खराब होऊ शकते. कुटुंबात मन प्रसन्न राहील. जोडीदाराकडून सहयोग मिळेल. आज मोठ्यांचा आदर करायला हवा. हा आठवडा आनंदात जाईल.
तुळ: गणेशजींच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले जाईल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.
वृश्चिक: या आठवड्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, तुमची फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद असेल, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल आणि नफ्याचा आनंद कायम राहील. पैशाशी संबंधित बाबींमध्ये चांगली बातमी मिळेल.
धनु: या आठवड्यात तुम्ही कामाशी संबंधित नवीन योजना बनवण्यात यशस्वी व्हाल. द्योगपती किंवा अधिकाऱ्यांशी ओळखी होतील.
मकर: कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. सकारात्मक परिणाम या आठवड्यात दिसून येतील. कोणतंही काम तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. वैवाहिक जीवनात सुख निर्माण होईल.
कुंभ: या आठवड्यात चांगली बातमी मिळेल. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळेल. देवावर विश्वास वाढेल कामात चांगला वेळ जाईल. तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ मिळेल.
मीन: या आठवड्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वडिलांचे आशीर्वाद चांगले राहतील. तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये काही शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.