मेष :  नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. मकर राशीचे लोक यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. योग्य दिशेने केलेले प्रयत्न अनुकूल परिणाम देतील. रागवर नियंत्रण ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ: काम मन लाऊन करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका.


मिथुन : अचानक झालेल्या आर्थिक लाभामुळे वृषभ राशीचे लोक मोठा विचार करू लागतील. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिवस अनुकूल जाण्याची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही आज आनंदी असू शकता.


कर्क :  सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 


सिंह : मेहनतीचं फळ नक्की मिळेल. नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा. तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.  


कन्या : या राशीच्या लोकांसाठी आपल्या जवळच्या मित्राचा सल्ला महत्वाचा ठरेल. व्यापारात वृद्धी होईल. कामानिमित्त प्रवास होईल. तरुणांना काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. कौटुंबिक वाद टाळा. आरोग्याच्या समस्या जाणवतील.


तूळ : आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा. वरिष्ठांचा सल्ला घेतल्यास मार्ग सापडू शकेल.  अनेक चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येतील. 


वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी आरोग्यच्या समस्या उद्भवतील. आपल्या पाल्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांशी वाद होतील अशा प्रकरणांमध्ये पडू नका. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरीची बातमी येईल. गृहिणींसाठी उत्साहाचे वातावरण राहील. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना आधी वरिष्ठांचा सल्ला घ्या . यश प्राप्तीचे योग आहेत. 


धनु : चंचलता वाढेल. काम वेळेत पूर्ण करा. मित्रांची मदत करा. आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नाराज असलेल्यांची समज काढाल. मान सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे. 


मकर : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.  प्रियकर / प्रेयसी आपला वेळ आनंदात घालवू शकतील. गृहिणी आणि महिलांना काहीशा आरोग्याच्या समस्या जाणवतील.


कुंभ : कुटुंबातील वाद कमी होतील. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. या राशीच्या लोकांना आज प्रवासाची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकते. व्यापाऱ्यांना विदेश कंपन्यांकडून चांगली ऑफर मिळू शकते. 


मीन : 
या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता.आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. वायफळ खर्च करु नका.