Horoscope 27 September : आज 27 सप्टेंबर 2022, आजचा दिवस मंगळवार, नवरात्रोत्सवाची दुसरी माळ. देवीच्या रुपांची पूजा या नभ दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. अशा या मंगलपर्वात दिवसाची सुरुवात करूया राशीभविष्यानं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries Horoscope Today)
जीवनात परिवर्तनातून मोठा फायदा होणार आहे. नोकरीच्या सर्व समस्या दूर होतील. देवीला नैवेद्यात पेठा अर्पण करा. 


वृष (Today Taurus Horoscope)
राहणीमान सुधारेल. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीची मदत मिळेल. देवीच्या चरणी नतमस्तक होताना मध अर्पण करा. उपवासाचे नियम पाळा. 


मिथुन (Today Gemini Horoscope)
आर्थिक लाभ मिळण्याचा योग आहे. देवीच्या आराधनेनं तुमचं आयुष्य सार्थकी लागणार. अपेक्षित शुभवार्ता मिळणार. 


कर्क (Cancer Horoscope Today)
करिअरशी संबंधीत सर्व तणाव दूर होणार आहेत. नव्या योजना आखाल. देवीला सफेद फूल अर्पण करा. 


सिंह (Leo Horoscope Today)
नोकरीच्या संधी मिळणार आहेत. एखादा प्रवास करु शकता. लहान मुलींना फळं द्या. 


कन्या  (Horoscope Virgo Today)
प्रेमाची नाती मार्गी लागणार आहेत. आरोग्याच्या चिंता दूर होणार आहेत. नातेवाईकांची भेट घडणार आहे. 


तुला (Libra Horoscope Today)
जुने वाद मिटणार आहेत. समाजात मान सन्मान मिळेल. देवीची उपासना करा. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
मानसिक तणाव दूर होणार आहे. लहानसहान गोष्टींचा अवाजवी विचार न केलेला बरा. छोट्या दोस्तांची साथ मिळेल. 


धनु (Sagittarius Horoscope Today)
विवाहयोग आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. देवीला लाल वस्त्र अर्पण करा. 


मकर (Today Capricorn Horoscope)
विवाहोत्सुक तरुणांसाठी स्थळं चालून येणार आहेत. एखादी अशी व्यक्ती भेटेल, जी तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


कुंभ (Today Aquarius Horoscope)
आर्थिक पाठबळ मिळणार आहे. धार्मिक कामांमध्ये वेळ जाईल. लक्ष्मीचरणी कुंकू अर्पण करा. 


मीन (Pisces Horoscope Today)
नोकरीच्या सर्व समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. आज एखादी गोड बातमी मिळेल.