मेष- आज जबाबदारीने वागा. व्यापारामध्ये नव्यानं गुंतवणूक करण्यापेक्षा आहे त्या पैशांना मार्गी लावण्याचा विचार करा. कोणत्याही गोष्टीचा फार विचार करु नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी काही चूक झाल्यास घाबरून जाऊ नका. महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा. 


कर्क- मित्रांसमवेत संवाद साधा. कामावर एककेंद्री राहा. असं कोणतंही काम करु नका, ज्यामुळं आप्टेष्ट दुखावले जातील. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह- वरिष्ठांशी संवाद साधताना शब्द सांभाळून वापरा. सकाळच्या वेळी फिरायला जा, सामाजिक कामांमध्ये सहभागी व्हा. 


कन्या- आज कामाच्या ठिकाणी मन रमणार नाही. भागीदारीमध्ये एखादं काम सुरु केलं असेल तर त्यावर पूर्म लक्ष द्या. घरगुती वाद मिटणार आहेत. शनीच्या कृपेने तुमच्या वाटेतले अडथळे दूर होणार आहेत. 


तुळ- आळस दूर लोटून नव्या जोमानं कामाला लागा. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. मित्रपरिवाराला भेटण्याची संधी मिळेल. 


वृश्चिक - आरोग्याची काळजी घ्या. सर्दी पडसं त्रास देऊ शकतात. कोणत्याही मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वप्रथन मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. 


धनु- ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता, त्या व्यक्तीशी संवाद साधा. तुमच्या अर्ध्या समस्या मार्गी लागतील. नोकरीची एखादी नवी संधी मिळेल. इतरांच्या अपेक्षेनुसार काम करा. 


मकर- नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागू शकते. पण, अपेक्षित कामाची पोचपावतीही तुम्हाला आजच मिळणार आहे. संयम ठेवा. 


कुंभ- गुरुतुल्य व्यक्तीची भेट घडण्याचा योग आहे. त्यांच्याशी चर्चा करा, विचार करुन निर्णय घ्या. कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करताना दिसाल. 


मीन- नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी निभावण्याची संधी मिळू शकते. मित्रांसमवेत भरपूर गप्पा मारण्याचा योग आहे. शनीदेवाचा तुमच्यावर आज वरदहस्त असेल.