How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला. यासोबत द्वारकेचा देखील नाश झाला. या सगळ्या प्रकरणाला कंटाळून आणि रागवून श्री कृष्ण जंगलात राहू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांनंतर श्री कृष्ण यांनी देखील देह त्याग करत वैकुंठात परतले. ही श्री कृष्ण यांचीच एक लीला असं म्हणायला हरकत नाही. एकदा सोमनाथजवळ स्थित असलेल्या प्रभास क्षेत्रात श्री कृष्ण एका झाडाच्या खाली आराम करत होते. तेव्हाच एका शिकाऱ्यानं हरीण समजून बाण सोडला आणि तो बाण श्री कृष्णच्या तळपायाला जाऊन लागला. या बाणामुळे श्री कृष्ण यांचे निधन झाले. खरंतर जेव्हा हा बाण लागला तेव्हा श्री कृष्णनं देह त्याग करण्याचा निर्णय घेतला. 


पौराणिक कथेनुसार, हा शिकारी त्रेका युगातील वानरराज बाली होता. खरंतर, त्रेतायुगात विष्णु देवानं प्रभू रामाचा अवतार घेत पृथ्वीवर जन्म घेतला होता. तेव्हा त्यांनी वानरराज बालीला लपून बाण मारला होता. जेव्हा विष्णु देवाणं कृष्ण रुप घेतलं तेव्हा त्यांनी बालीला जरा नावाच्या शिकारी बनवलं आणि स्वत: साठी अशा मृत्यूला निवडले, जशी त्यांना त्रेतायुगात बालीला दिली होती. 


हेही वाचा : A अक्षरावरून नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण


 


दरम्यान, महाभारत युद्धात कौरवांचे निधन झाले. आपल्या सगळ्या मुलांचे निधन झाले, यासाठी गांधारीनं श्री कृष्णला जबाबदार ठरवले होते.  या दु:खात असलेल्या गांधारीनं श्री कृष्णला शाप दिला होता. त्यावेळी शाप देत गांधारी म्हणाली ज्या प्रकारे कौरवांचा नाश झाला आहे. त्याच प्रमाणे यदुवंशचा देखील नाश होईल. गांधारीनं दिलेल्या त्या शापानं यदु वंशाचा हळू-हळू नाश होऊ लागला आणि  त्याच्या 36 वर्षांनंतर श्री कृष्ण यांनी देह त्याग केला. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)