Happy Marriage Tips : नवरा बायकोमध्ये तणाव, नातं घटस्फोटापर्यंत जातंय, तर करा `हा` गंठबंधनचा उपाय
Happy Marriage Tips : नवरा बायकोमधील नातं हे आबंट गोड असतं. एकमेकांशी मतभेदातून वादही होतात. पण जेव्हा हे वाद टोकाला जातात तेव्हा समोर अंधार दिसतो. अशात ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी उपाय सांगितले आहेत.
Happy Marriage Tips According to Astrology Upay in Marathi : नातं कुठलंही असो त्यात त्यात आंबट गोड अनुभव असतात. पण नवरा बायकोचं नात तर हे तर क्षणात भांडण आणि क्षणात प्रेम...हे नातं आंबट, गोड, खराट आणि तिखटं असं सर्व चव त्यात असतं. अगदी एका लोणच्या सारखं...लोणचं जेवढं मोरतं तेवढं त्याचा स्वाद वाढतो. नवरा बायकोचं नातही तसंच असतं. जेवढा वर्ष संसार, सहवास तेवढं त्यात प्रेम, काळजी, माया असते. पण जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात तणाव, वाद आणि भांडण सुरु होता आणि ते टोकाला जातात. तेव्हा त्या दोघांसोबत दोन्ही घरातील मंडळी निराश होतात. (How to Have a Happy Marriage According to astrology gathbandhan upay or astro remedies in Marathi)
'हा' उपाय करेल नात्यातील तणाव दूर!
ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी नवरा बायकोमधील नात्याला मजबूत करण्याचे गुपित सांगितलं आहे. ती म्हणते की, जर तुम्हाला आनंदी संसार हवा असेल तर लग्नाच्या वेळी गठबंधन करताना उपाय सांगितला आहे. गठबंधन करताना त्यात पाच गोष्टी ठेवायला पाहिजे. त्यात चांदीच नाणं, फुलं, हळद, दुर्वा आणि अक्षता ठेवून गठबंधन करावे.
जया यांनी या पाच गोष्टीच महत्त्वही सांगितलं आहे. फुलं हे, वैवाहिक जीवनात फुलासारखं फुलू दे, चांदीच नाणं हे संसारात भरभराटीचं प्रतिक, हळद जे जोडप्याचा चांगल्या आरोग्यासाठी, अक्षत हे प्रतिक असतं कपलच्या आयुष्यात कायम धन्नसंपदा राहावी आणि दुर्वा जी सुकाल्यानंतरही आपला दर्जा सोडत नाही. दुर्वानुसार कपलने कठीण प्रसंगातही ते एकमेकांना सोडू नये.
आता ज्या लोकांचे लग्न झालं आहे, गठबंधन करताना या वस्तू तुम्ही ठेवल्या नसतील, तरीही टेन्शन नाही. आता ज्या जोडप्यांमध्ये सतत भांडण होत आहे. अशावेळी नवरा बायकोचे कपडे घेऊन त्यात या पाच गोष्टी ठेवून गाठ बांधावी. त्यानंतर ही कपड्यांची पोटली त्यांच्या फोटोसमोर ठेवावी. त्यांच्या बेडरुममध्ये किंवा घरात, साऊथ वेस्ट ठेवल्यास गठबंधनचा उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)