Shani Dev Upay : जीवनात काही मनाजोगं घडत नसेल, सतत अपयश येत असेल तर नकळतच आपण 'साडेसाती सुरुये माझी वाटतं' असं म्हणून मोकळं होतो. पण, तुम्ही कधी साडेसाती या शब्दामागचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला माहितीये का, ज्या शनिच्या साडेसातीमुळं काही कामांमध्ये अडथळा येत असतो त्याच शनिदेवाच्या प्रसन्न होण्यानं आयुष्याला कलाटणी मिळते. असं म्हणतात की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठीच्या 15 उपायाचं पालन केल्यास त्यांची कृपा आपल्यावर होते, त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुद्राक्षांची माळ - सकाळी स्नानानंतर एका आसनावर बसा, समोर शनिदेवाची मूर्ती अथवा छायाचित्र ठेवून त्याची यथासांग पूजा करा. आता रुद्राक्षांची माळ घेवून शनिमंत्राचा जप करा. सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. 


शनिची नावं- कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद आणि पिप्पलाद अशा शनिच्या 10 नावांची पूजा मांडा. 


मारुतीचं पूजन- सूर्यास्तानंतर मारुतीरायाची पूजा करा. काळ्या तिळाचं तेल, शेंदूर, निळी फुलं अशा गोष्टी पूजेसाठी वापरा. 


रक्तचंदनाची माळ - रक्तचंदनाची माळ अभिमंत्रित करून परिधान करा, सर्व कष्ट दूर होतील. 


काळा धागा - अभिमंत्रित काळा धागा परिधान केल्यानं सर्व कामांमध्ये यश मिळतं. 


काळ्या चण्यांचा प्रसाद- सव्वा सव्वा किलो काळे चणे तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजवा. आता अंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून शनिची पूजा करा आणि चण्यांना राईच्या तेलात फोडणी देऊन हा प्रसाद शनिदेवापुढे ठेवा. हे चणे म्हशीला खायला द्या. दुसरे सर्वा किलो चणे रुग्णांमध्ये वाटा. 


तिळाच्या तेलाचा दिवा- संध्याकाळच्या वेळी वडाच्या किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली सूर्योदयाच्या आधी स्नान वगैरे करून दिवा लावा. 


हेसुद्धा वाचा : Kaal Sarp Dosh पासून सुटका मिळावी म्हणून नाग देवतेच्या 'या' मंदिरात जाऊन घ्या दर्शन


मांस, मद्याचं सेवन टाळा - शनिची साडेसाती, महादशा सुरु असल्यास मांस, मद्याचं सेवन टाळा. यामुळं शनिचा प्रभाव कमी होतो. 


काळा कोळसा - सकाळच्या स्नानानंतर काळा कोळसा, लोखंडाचा खिळा काळ्या कापडात बांधून स्वत:च्याच डोक्यावरून फिरवून वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि शनिमंदिरात जाऊन प्रार्थना करा. 


दान करा- एका कांस्याच्या वाटीमध्ये तिळाचं तेल घेऊन त्यात स्वत:चा चेहरा पाहून, काळ्या कापडात काळे उडीद बांधा, सव्वा किलो धान्य, दोन लाडू, फळं, कोळसा आणि लोखंडाचा खिळा शनिचं दान घेणाऱ्या व्यक्तीला द्या. 


चपाती खायला द्या- दोन चपात्या घ्या आणि एकिला तेल, दुसरीला तूप लावा. आता तेल असणाऱ्या चपातीवर एखादा गोडाचा पदार्थ ठेवून काळ्या रंगाच्या गायीला हा प्रसाद खायला द्या. दुसरीही चपाती तिला भरवा आणि शनिदेवाचं स्मरण करा. 


माशांना काळे चणे - शनि जयंतीच्या एक दिवस आधी काळे चणे पाण्यात भिजवा. शनि जयंतीच्या दिवशी हे चणे, कोळसा, लोखंडाची पत्री एका काळ्या कापडात बांधून ती तलावातील माशांसाठी सोडा. वर्षभरासाठी हा उपाय करा, पण त्यादरम्यान मत्स्याहार टाळा. 


शमीचं मूळ- शमीच्या रोपाचं मूळ यशासांग घरी आणा. शनिवारच्या दिवशी श्रवण नक्षत्रात किंवा कोणत्याही योग्य दिवशी ते अभिमंत्रित करून दंडावर काळ्या धाग्यातून परिधान करा. 


माकड आणि श्वानसेवा- शनि जयंती आणि प्रत्येक शनिवारी माकडं, काळे श्वान यांना बुंदीचे लाडू द्या. जेणेकरून त्यांचा प्रभाव कमी होईल. 


शनी यंत्राची स्थापना - घरात शनियंत्राची स्थापना करून दररोज त्याची न चुकता पूजा करा. या यंत्रापुढं दिवा लावा. 


(वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )