Kaal Sarp Dosh : कुंडलीत काल सर्प दोष असणाऱ्या अनेकांना त्यांच्या स्वप्नात साप दिसतो. त्यांना सापाची खूप भीती वाटते. पण मग काल सर्प दोषचे निवारण कसं करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहितीये कुंडलीतून काल सर्प दोष घालवायचा असेल तर कोणतीही पूजा न करता तुम्ही फक्त एका मंदिरात जाणून यातून सुटका मिळवू शकतात. हे मंदिर कोणतं? कुठे आहे आणि त्याच्या दर्शनानं दोष कसे दूर होतात? हे जाणून घेऊया...
कुठे आहे हे मंदिर?
काल सर्प दोषमधून सुटका हवी असेल तर तुम्हाला नागराज वासुकी या मंदिरात जावं लागेल. हे मंदिर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये असलेल्या दारागंज परिसराच्या उत्तर भागात आहे. नागराज वासुकी हे मंदिराचे देवता आहेत. नागराज वासुकी हेच या मंदिरात देवाच्या रुपात आहेत. नागराज वासुकी यांचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून त्यांचे भक्त घेतात.
जगात आहे लोकप्रिय
अनोख्या वास्तुकलेसाठी नागराज वासुकी यांचे हे मंदिर जगात लोकप्रिय आहे. त्यातही हे एकमेव मंदिर आहे जे नागराज वासुकी यांच्यासाठी बनवण्यात आले आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या उंबरठ्यावर शंख वाजवणारे दोन कीचक आहेत. यात लक्ष्मीचे प्रतीक असलेले कमळ दोन हत्तींनी बनवलेले आहे. त्याच्यात असलेली वास्तु ही सगळ्यांचे लक्ष वेधणारी आहे. नागराज वासुकी देवता देखील आकारानं आणि रुपानं सुंदर दिसतात. खरंतर हे मंदिर नाग देवता नागराज वासुकी यांच्यासाठी बनवण्यात आलेलं एकमेव मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दोषांपासूनच नाही तर रोगांपासूनही मिळते सुटका
या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की एक मराठा राजा होता ज्याला कुष्ठरोग झाला होता. त्यानं नाग वासुकीच्या मंदिरात नवस मागितला की त्याचा कुष्ठरोग बरा झाला तर मंदिराचा जीर्णोद्धार करेल. यानंतर काही वेळातच राजाची कुष्ठरोगातून मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी नाग वासुकी मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. याशिवाय मंदिरासोबत घाटही त्यांनी बनवला.
कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कशी करावी मंदिरात पूजा
नागराज वासुकी मंदिरात भाविकांनी स्वत:च्या पूजेचे साहित्य स्वत: आणावे, असे मंदिराच्या पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासनेची पद्धतही सांगितली आहे. सर्वप्रथम प्रयागच्या संगमात स्नान करावे. त्यानंतर वाटाणे, हरभरा, फुले, हार आणि दूध घेऊन नाग वासुकी मंदिरात जावे. यानंतर वासुकी नागाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना पूजा साहित्य अर्पण करावे. त्यानंतर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी.
काल सर्प दोषचे निवारण होण्यासाठी आहे हा मंत्र
नाग गायत्री मंत्र: 'ॐ नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्। ' इस मंत्र को कालसर्प दोष निवराण के लिए प्रभावी माना जाता है. इसके अलावा आप 'ॐ नमः शिवाय' और 'ॐ नागदेवताय नम:' या मंत्रचं जप करू शकता. रुद्राक्ष माळेच्या मदतीनं 108 वेळा जप करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)