राशीनुसार असं होईल तुमचं लग्न
लग्नसराईचा हंगाम सध्या सुरु आहे. प्रत्येकजणाचे आपल्या लग्नाबाबतचे काही स्वप्न असते. जीवनातील हा दिवस त्या व्यक्तीसाठी खास असतो. त्यामुळे हा दिवस कसा अविस्मरणीय करता येईल याकडे लक्ष असते. अनेकांनी तर लग्नासाठी विशेष प्लानिंगही केलेले असते. कितीही प्लानिंग केले तरी काही गडबड होऊ नये अशी भीती सतत मनात अशते. जाणून घ्या राशीनुसार कसे होणार लग्न
मुंबई : लग्नसराईचा हंगाम सध्या सुरु आहे. प्रत्येकजणाचे आपल्या लग्नाबाबतचे काही स्वप्न असते. जीवनातील हा दिवस त्या व्यक्तीसाठी खास असतो. त्यामुळे हा दिवस कसा अविस्मरणीय करता येईल याकडे लक्ष असते. अनेकांनी तर लग्नासाठी विशेष प्लानिंगही केलेले असते. कितीही प्लानिंग केले तरी काही गडबड होऊ नये अशी भीती सतत मनात अशते. जाणून घ्या राशीनुसार कसे होणार लग्न
मेष - मेष राशीच्या व्यक्ती फन लव्हिंग अशतात. या राशीच्या लोकांची लग्न धूमधामीत होतात.
वृषभ- परंपरा जपणाऱ्या या व्यक्ती असल्याने लग्नही त्याच पद्धतीने व्हावे याकडे यांचा कल असतो. या राशींच्या व्यक्तींची लग्ने रॉयल पद्धतीने होतात.
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींचे लग्न हे एखाद्या सणापेक्षा कमी नसते. प्रत्येक क्षण एंजॉय करतात.
कर्क - कर्क राशीच्या लोकांची लग्ने ही विशेषकरुन कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यापुरतीच सीमित असतात. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याला पसंती देतात.
सिंह - या राशीच्या लोकांची लग्ने राजेशाही थाटात होतात. यावेळी त्यांचा लग्नातील लूक हा राजेशाही अवतारापेक्षा कमी नसतो.
कन्या - या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट परफेक्ट करतात. त्यामुळे लग्नातही तितकाच परफेक्टपणा असतो. या व्यक्तींच्या लग्नात डेकोरेशनपासून ते खाण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टीत परफेक्टपणा असतो.
तूळ - सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक लग्ने होतात. या दरम्यानच तूळ राशींच्या व्यक्तींचा जन्म होतोय. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी लग्नाचे महत्त्व फार असते.
वृश्चिक - वृश्चिक राशींच्या व्यक्तींची लग्ने धूमधामीत होते. खाणे, डेकोरेशन, डान्स प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते.
धनू - या राशींच्या व्यक्तीची लग्ने डेस्टिनेशन वेडिंग असतात. यांच्या लग्नात एंटरटेनमेंट अॅक्टिव्हिटीज अधिक असतात.
मकर - मकर राशीच्या व्यक्ती पारंपारिक असतात. त्यामुळे शांततेत हा समारंभ करण्याकडे यांचा कल असतो. मॉर्डन गोष्टींऐवजी पारंपारिक गोष्टींना अधिक महत्त्व देतात.
कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्ती मकर राशीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. कारण यांच्या लग्नात परंपरेला अधिक स्थान नसते.
मीन - मीन राशींच्या व्यक्तींची लग्ने अगदी बॉलीवूड स्टाईलप्रमाणे असतात. हे लग्नसोहळे रोमँटिक, सुंदर आणि अविस्मरणीय असे असतात.