मुंबई : महान आचार्य चाणक्य यांच्या धोरणांनी नंद वंशाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याला सम्राटाचा मुकुट दिला होता. आचार्य चाणक्यांच्या नीती माणसाला फक्त यशचं मिळवून देत नाही, तर संकटांवर कशाप्रकारे मात करायला हवी... शिवाय जीवनात कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं आणि कोणत्या गोष्टींपासून दूर रहायला हवं.... अशी महत्त्वाची शिकवण आचार्या चाणक्य नीतीमध्ये दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते, जी दूर गेल्यामुळे आपल्या जवळ असलेला खास व्यक्ती देखील आपल्याला सोडून जातात. 


चाणक्य सांगतात, जवळ पैसे असतील तर आयुष्यात सगळे सुख आपण खरेदी करू शकतो. पण आपल्याकडे पैसे नसतील तर आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती देखील आपल्यापासून दूर जातात. 


प्रत्येक जण आपली साथ सोडतो. पण एखादा व्यक्ती श्रीमंत असेल, तर त्या व्यक्तीसोबत नातं जोडण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो... त्यामुळे जवळ पैसे असणं फार महत्त्वाचं असतं. 


पण पैसे कमवताना कधीही वाईट मार्गाचा वापर करू नका असं देखील चाणक्य सांगतात. करण वाईट मार्गाने कमावलेला पैसा 10 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही. 


वाईट मार्गाने कमावलेल्या पैश्यांमुळे अनेक अडचणी आणि संकटं देखील वाटेवर येतात. एवढंच नाही तर, यामुळे एखाद्याची प्रतिष्ठा देखील कमी होते. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)