Proper method of Aarti : भारतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी आरतीला विशेश महत्त्व आहे. आरती केल्याशिवाय पूजा पूर्ण संपन्न होतं नाही. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यांतील (Margashirsha Month 2022) गुरुवारी देवीची पूजा करण्यात येतं आहे. अशात गुरुवारी संध्याकाळी घटाची पूजा करुन आरती केली जाते. आरती झाल्यानंतर ताटावरून हात का फिरवला जातो? तर भक्त दिव्यावरुन हाथ फिरवून तो हात डोळ्यांना लावतात किंवा डोक्यावरुन फिरवतात. परंतु असं का केलं जाते तुम्हाला माहितीय?


आरती करण्याची योग्य पद्धत कोणती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की आरती करण्याची योग्य पद्धत कोणती. खरंतर भगवंताची आरती करताना, दिवा फिरवण्याच्या संख्येची आणि पद्धतीची विशेष काळजी घेतली जाते.


आरतीची सुरुवात नेहमी देवाच्या चरणांनी करावी, हे सर्वसामान्यांना माहित नसतं. चार वेळा आरती सरळ दिशेने फिरवावी आणि त्यानंतर 2 वेळा देवाच्या नाभीची आरती करावी. यानंतर देवाच्या मुखाची आरती 7 वेळा करावी.


 


हेसुद्धा वाचा - Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं


 


भगवंताची आरती झाल्यानंतर भाविक दोन्ही हातांनी आरती घेतात. या दरम्यान 2 भाव आहेत, पहिलं म्हणजे, ज्या दिव्याच्या ज्योतीने आम्हाला आमच्या आराध्यची नख-शिखरांचं इतकं सुंदर दर्शन दिलं आहे, ते आम्ही  त्याला आमच्या डोक्यावर ठेवतो आणि दुसरा भाव म्हणजे, देवासाठी ज्या दिव्याची वातीने देवाची सेवा केली आहे किंवा देवाला खुश केले आहे तिला आम्ही आमच्या डोक्यावर ठेऊ इच्छीत आहे. (Interesting fact Proper method of Aarti vastu tips pooja tips marathi news)


आरती घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथम डोक्यावर हार फिरवून मग त्या आरतीची ज्योत कपाळावर धरावी किंवा ती आरती डोक्याला लावावी.


 


हेसुद्धा वाचा - Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम


 


आरती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


आरती करताना तुम्ही जे काही बोलत आहात, त्याचा उच्चार बरोबर असावा, असा प्रयत्न केला पाहिजे, असे धर्मतज्ज्ञ सांगतात. तसंच आरतीच्या वेळी इतर कोणत्याही विषयाचा विचार करू नये. विशेषत: मोबाईलवरून लक्ष हटवा आणि देवाची आरती फक्त 5 मिनिटे पण एकाग्रतेने करा.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)