Isha Ambani blessed with twins Aadiya and Krishna: रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचं लग्न 12 डिसेंबर 2018 झालं होतं. ईशा अंबानीचे पती आनंद (Anand Piramal) हे देखील एक बिझनेसमन आहेत आणि पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. लग्नाच्या तीन वर्षानंतर ईशा (Isha Ambani) आणि आनंद आई-वडील झाले आहेत. ईशानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मुलीचं नाव आदिया (Aadiya) आणि तर मुलाचं नाव कृष्णा (Krishna) असं ठेवण्यात आलं आहे. अंकज्योतिष शास्त्रानुसार ईशा आणि आनंद यांच्या मुलांच्या नावाचा नेमका अर्थ काय? अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंक ग्रहाशी संबंधित आहे. सूर्य 1, चंद्र 2,  गुरू 3, राहू 4, बुध 5, शुक्र 6, केतू 7, शनि 8 आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. अंकशास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात.


कृष्णा या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा अंबांनीच्या मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं आहे. कृष्णा हा भगवान विष्णू यांचा आठवा अवतार आहे. कृष्णा या नावाचा अर्थ प्रेम, शांती आणि स्नेह असा होतो. कृष्णा या नावाचा मूलांक काढल्यास 8 येतो. अंकशास्त्रानुसार, कृष्णा नावाचा अर्थ प्रेमळ, शक्ति प्राप्त करणारा, आत्मनिर्भर आणि लक्ष्य गाठणारा असा होतो.


 8 अंकावर शनिचा प्रभाव आहे. मूलांक 8 असलेले लोकं मॅनेजमेंटशी निगडीत सर्व कामं करतात. लोकांना ओळखण्याची चांगली क्षमता लोकांमध्ये असते. अशा लोकांना मोठे प्रकल्प एकट्याने हाताळण्याची क्षमता असते. पण या लोकांना जास्त मेहनत करावी लागते. विशेष म्हणजे सहजपणे सर्वांचा विश्वास जिंकतात. असे लोक कोणाच्याही हाताखाली काम करत नाहीत. विश्वासाच्या बळावर हळूहळू का होईना नक्कीच स्थान मिळवतात. 


बातमी वाचा- Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला गुरू होणार मार्गस्थ, या राशींना होणार फायदा


आदिया या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र


ईशा अंबानीच्या मुलीचं नाव आदिया ठेवण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ सुरुवात किंवा शक्ति असा होतो. आदिशक्तिशी निगडीत हे नाव आहे. आदिया नावाचा मूलांक 5 आहे. आदिया नावाचा अर्थ प्रगती, प्रिय, मजबूत, दूरदर्शी, साहसी आणि आध्यात्मिक असा होतो. आदिया नावाचा मूलांक 5 होतो. 5 या अंकावर बुध ग्रहाचं अधिपत्य आहे. बुध हा ग्रह वाणी, बुद्धी, व्यापाराचा कारक ग्रह आहे.


5 मूलांक असलेल्या लोकांचा सकारात्मक विचारांवर विश्वास असतो. बुधाचा प्रभाव असल्याने कोणतेही काम करण्याची ऊर्जा असते. प्रत्येक क्षेत्राची माहिती त्यांना असते. एकापेक्षा जास्त गोष्टी करण्याची गुणवत्ता आहे. संसाधने कशी वापरायची हे चांगले माहित असतं. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)