Janmashtami 2022: आजपासून अनेक घरात वेध लागले आहेत ते जन्माष्टमीचे. आपल्या श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी महिला घरी स्वागताची तयारी करत आहेत. बाळगोपाळ आणि त्याचा पाळणा सजविण्यासाठी बाजारात खरेदी केली जाते आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी 12 राशीच्या लोकांनी दानधर्म केलं तर त्यांना भरपूर ऐश्वर्य आणि सुख प्राप्त होतं. चला मग गुरुवारी 18 ऑगस्टला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तूचं दान करायचं आहे ते पाहा. हे दान करुन आपल्या आयुष्यातील संकटे दूर करा. (janmashtami 2022 daan according to your zodiac sign to get laddu gopal grace money in marathi)


तुम्हाला काय दान करायचं आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : गव्हाचे दान आणि श्री विष्णु सहस्रनामाचे पठण 


वृषभ : साखरेचे दान 


मिथुन: गरीब आणि गरजूंना अन्नधान्य दान 


कर्क : तांदूळ दान 


सिंह : सकाळपासून श्री आदित्य हृदय श्रुत पठण करुन संध्याकाळी गुळाचे दान 


कन्या : गरिबांना अन्नधान्य दान 


तूळ :  गरिबांना वस्त्रदान किंवा पंचामृत किंवा पंजिरी अर्पण करणे, फळे वाटणे 


वृश्चिक : गहू गरजूंना दान 


धनु : मंदिरांमध्ये धार्मिक ग्रंथांचे दान शिवाय कोणत्याही गरजूंना पुस्तके दान


मकर : तिळाचे दान 


कुंभ : अन्न किंवा तिळाचे दान आणि गीतेच्या पाचव्या आणि आठव्या अध्यायाचा अभ्यास करावा


मीन: मोराची पिसे आणि बासरी अर्पण करावी. शिवाय लहान मुलांना आणि गरिबांना केळी दान 


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)