Janmashtami 2024 : जन्माष्टमीला द्वापर युग! पूजा करताना `ही` चूक अजिबात करु नका! पूजा विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका.
Krishna Janmashtami 2024 Muhurta In Marathi : अख्खा देशात 26 ऑगस्ट सोमवारी जन्माष्टीचा उत्साह असणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जयंती साजरी करण्यात येते. प्राचीन कथेनुसार रोहिणी नक्षत्रात श्रावण अष्टमीला रात्री बारा वाजता कान्हाचा जन्म झाला होता. यंदाची जन्माष्टमी अतिशय खास आहे, यादिवशी द्वापर योग आहे. यादिवशी जयंती योग, रोहिणी नक्षत्रासोबत, चंद्र वृषभ राशीत आणि सूर्य सिंह राशीत असल्याने गजकेसरी योगही जुळून आला आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथी?
वैदिक पंचांगानुसार गोकुळ अष्टमी तिथी रविवार 25 ऑगस्ट 2024 ला मध्यरात्री 3.39 वाजेपासून सोमवारी 26 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 2.19 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट 2024 गौकुळ अष्टमी साजरी करण्यात येणार आहे. तर 27 तारखेला दहीदंडीचा उत्साह असणार आहे.
हेसुद्धा वाचा - Janmashtami 2024 Horoscope : जन्माष्टमीला गजकेसरी राजयोग! या राशींना प्रगतीसह आर्थिक लाभ, श्रीकृष्णाचाही मिळणार आशीर्वाद
जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)
कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असणार आहे. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ असेल.
श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा साहित्य
श्रीकृष्णाची मूर्ती
एका भांड्यात पाणी
अर्धा मीटर पांढरा कापड
अर्धा मीटर लाल कापड
फ्लॉवर
पुष्पहार
केशर
चंदन
कुमकुम
अबीर
गुलाल
अभ्रक
हळद
तांदूळ
आंब्याची पाने
श्रीकृष्णासाठी कपडे
दागिने
कोथिंबीर पंजिरी
लोणी साखर
तुळशी
मुकुट
मोर पंख
बासरी
सिंहासन
स्विंग
सुपारी
सुपारीची पाने
लाकडी स्टूल
कमलगट्टा
तुळशीची माळ
धणे पाने
गंगेचे पाणी
मध
साखर
तूप
देठ सह काकडी
दही
दूध
हंगामी फळ
दिवा
धूप, अगरबत्ती
कापूर
सप्तामृतिका
अर्पण किंवा मिष्टान्न
छोटी वेलची
लवंग
परफ्यूम
पंच पल्लव (वटवृक्षाची पाने, गूळ, पीपळ, आंबा आणि पाकर)
पंचामृत
बंडनवार
तंबूल (लवंग असलेली सुपारी)
नारळ
धान्य (तांदूळ, गहू, बार्ली, ज्वारी)
टेबल सजवण्यासाठी आयटम
काकडी नक्की कापा!
रात्री 12 वाजता काकडी कापून कान्हाचा जन्म होतो, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीच्या दिवशी काकडी त्याच्या देठापासून वेगळी केली जाते. हे श्रीकृष्णाच्या माता देवकीपासून वेगळे होण्याचे प्रतीक मानले जाते. त्याशिवाय बालगोपाळाला तुळशीचे पान आणि नैवेद्यावर तुळशीचे पान अर्पण करावे.
या रंगाचे कपडे परिधान करु नका!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणात चुकूनही काळे कपडे घालून पूजा करू नका. हे अशुभ आहे. त्याऐवजी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. श्रीकृष्णाला अगस्ती फुले अर्पण करू नयेत. बालगोपालांचे गाईशी अतूट नाते असते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही गायींना त्रास देऊ नका, अन्यथा पूजा आणि व्रत व्यर्थ जाईल. या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. पूजेच्या एक दिवस आधी तुळशीची पाने तोडावीत. जन्माष्टमीचे व्रत केल्यास चुकूनही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची विधी
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर, देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग अथवा पाटावर मांडावी. आता गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर, मुर्तीला दूध किंवा पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर, गोपी चंदनाचा टिळा मूर्तीला अथवा प्रतिमेला लावा. बाळकृष्णाचा साजऋंगार करा, फुलांच्या माळा अर्पण करा. मूर्तीसमोर तुपाचा दिवा किंवा निरांजन लावा. धूप-अगरबत्ती लावा. त्यानंतर, बाळगोपाळाची आरती करा आणि मनोभावे प्रार्थना करून साखर, मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)