Janmashtmi 2022: भगवान श्रीकृष्णाला या 4 राशी सर्वाधिक प्रिय, या जन्माष्टमीला दूर होईल संकट
Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.
मुंबई : Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. या राशींबद्दल जाणून घ्या.
देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमी 2022 ची तयारी जोरात सुरु आहे. तिथीनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. यामुळेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वामी असतो. या 12 राशींपैकी काही राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा आहे.
वृषभ
भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार त्याला वृषभ राशीची आवड आहे. वृषभ राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची उपासना करत राहावे.
कर्क
याशिवाय भगवान श्रीकृष्णाची कृपा कर्क राशीवर आहे. कर्क राशीच्या लोकांना भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळते. भगवान श्रीकृष्णाच्या विशेष कृपेने या राशीच्या लोकांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवरही भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. असे मानले जाते की, या राशीचे लोक मेहनती असतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची पूजा करत राहावे.
तूळ
भगवान श्रीकृष्ण देखील तूळ राशीशी संबंधित आहेत. या राशीच्या लोकांवर देवाची कृपा असते. देवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. या लोकांनी भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करत राहावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)