Guru And Shani Margi 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह त्यांच्या स्थितीत देखील बदल करतात. काही ग्रह वेळोवेळी मार्गी होतात, तर काही वक्री अवस्थेत जातात. या सर्वांचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी महिन्यांमध्ये महिन्यात दिवाळीनंतर गुरु आणि शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत, तर 31 डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या मार्गी अवस्थेमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास (Aries Zodiac)


गुरु आणि शनिदेव मार्गी होणार हे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. अपूर्ण योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


गुरु आणि शनिदेव मार्गी असल्यामुळे तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण पडलेले काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.


सिंह रास (Leo Zodiac)


गुरु आणि शनिदेव सोबत सरळ चालणं तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढणार आहे. तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद वाढणार आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )