Jupiter Nakshatra Transit 2023 : वैदिक ज्योतिषामध्ये, विविध ग्रह-समय पर राशी बदलतात. त्याच्यासोबत ग्रह नक्षत्र गोचरही कायम आहे. बृहस्पति ग्रह ज्योतिष शास्त्रात महत्त्वाचा मानला ग्रह मानला जातो. गुरुच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पडताना दिसतो. गुरुने एप्रिलमध्ये मेष राशीमध्ये गोचर केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच गुरुच्या नक्षत्र गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 21 जून दुपारी 1 वाजून 19 मिनिटांनी भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. गुरु भरणी नक्षत्रामध्ये 27 नोव्हेंबरनंतर अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान गुरुच्या या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे, ते पाहुया.


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांना गुरूच्या गोचरमुळे खूप फायदा होणार आहे. या काळात प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्यास मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात तुम्ही खूप प्रगती कराल.


धनु रास


भरणी नक्षत्रात गुरूचा प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान शुभ परिणाम मिळणार आहेत. नोकरदारांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. यावेळी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबाचा सहवास चांगला राहणार आहे. अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत.


मेष रास


गुरूचा हा रास बदल मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होईल. एखादी मोठी गोष्ट हातात येऊ शकते. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना फायदा होईल. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते.


मकर रास


मकर राशीला गुरूचे संक्रमण सकारात्मक परिणाम देणार आहे. या काळात मान-सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. सरकारी नोकरीत असलेल्यांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील. 


सिंह रास


गुरूचे हे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. या दरम्यान या लोकांना अचानक पैसे मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. मोठ्या कंपनीत नोकरी मिळू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )