Guru Gochar 2024: ज्योतिष शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी गुरु ग्रह महत्त्वाचा मानला जातो. गुरूच्या गोचरला देखील खूप महत्त्व आहे. येत्या नवीन वर्षात गुरू 1 मे 2024 रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरु ग्रहाच्या राशी बदलामुळे नवीन वर्षात काही राशींचे भाग्य बदलणार आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे लोकांना शुभ फळ मिळणार आहे. असे सांगितले जाते. 1 मे रोजी दुपारी 2:29 वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना चांगला फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे.


मेष रास


मेष राशीच्या व्यक्तींना गोचर लाभदायक ठरणार आहे. बृहस्पतिच्या राशीत बदलामुळे तुमचे भाग्य मजबूत होणार आहे. यामुळे तुम्हाला नवीन वर्षात खूप मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्याच्या मदतीने तुमचा बँक बॅलन्स तर वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. तज्ञांच्या सल्ल्याने शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. ऑफिसमध्ये काही कामात तुम्हाला मोठी बढती मिळण्याची शक्यता आहे. 


कर्क रास


कर्क राशीच्या लोकांसाठी बृहस्पतिच्या राशीतील बदल खूप महत्वाचा असणार आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे तुमच्या महत्त्वाकांक्षेतील अडथळे कायमचे दूर होणार आहेत. नवीन वर्षात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. या काळात, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. 


सिंह रास


नवीन वर्षात देव गुरूच्या राशीत बदलामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम मिळत आहेत. गुरूच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी पूर्ण लाभ मिळेल. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबाची परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. नोकरीत मोठा बदल होऊ शकतो. जर तुम्ही विवाहित असाल, तर येत्या वर्षात तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )