Apara Ekadashi 2023 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतं असतात. कृष्ण पक्षाला पहिली एकादशी असते तर शुक्ल पक्षात दुसरी एकादशी असते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी संबोधलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाची (Bhadrakali Jayanti 2023) एकादशी खूप खास आहे. कारण अपरा एकादशीला भद्रकाली जयंती साजरी केली जाते. दक्षिण भारतात या दिवसाला विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की, अपरा एकादशी केल्यामुळे आपल्याला प्रंचड धनलाभ आणि पुण्य प्राप्त होतं. त्याशिवाय आपले सर्व पाप धुतले जातात. (Jyeshta ekadashi 2023 apara ekadashi date puja muhurat vidhi and Bhadrakali Jayanti)


कधी आहे अपरा एकादशी ?


यंदा अपरा एकदाशी ही 15 मे 2023 म्हणजे पुढच्या आठवड्यातील सोमवारी आहे. यादिवशी श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. 


अपरा एकादशी 2023 मुहूर्त


पंचांगानुसार,15 मे 2023 ला पहाटे 02.46 वाजता अपरा एकादशीचा मुहूर्त सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 16 मे 2023 ला पहाटे 01.03 वाजता संपणार आहे. 


अपरा एकादशीच्या उपवासाची वेळ - सकाळी 06.41 ते 08.13 (16 मे 2023)
विष्णूजींच्या पूजेची वेळ - सकाळी 08.54 ते 10.36 (15 मे 2023)


अपरा एकादशीचं महत्त्व


 अपरा एकादशीला गंगेच्या तीरावर पितरांना पिंडदान केल्याने आपले सर्व पाप धुतले जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. अपरा एकादशीला अजला एकादशी असंही म्हणतात. या दिवशी श्री हरीची पूजा केल्याने आणि ब्राह्मणांना दान केल्याने कीर्ती आणि संपत्ती वाढ होते. 


हेसुद्धा वाचा - Panchang Today : शनिच्या महादशेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या आजचं पंचांग


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)