Kalatmak Yog 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी नऊ ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असल्याने शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच चंद्राच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार झाला आहे. शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 8 डिसेंबर रोजी रात्री 9:35 वाजता चंद्र तूळ राशीत प्रवेश केला आहे. याठिकाणी शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे कलात्मक नावाचा राजयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत शुक्र सोबत चंद्राचा शुभ प्रभाव काही राशीच्या लोकांच्या जीवनावर अधिक प्रभाव टाकणार आहे. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. 


कर्क रास (Kark Zodiac)


या राशीच्या चौथ्या घरात कलात्मक योग तयार झाला आहे. या राशीच्या लोकांना या योगाचा विशेष लाभ होऊ शकतो. घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. वाहन खरेदी करू शकता. वडिलांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या संपत्तीत झपाट्याने वाढ करेल. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळेल.


तूळ रास (Tula Zodiac)


या राशीमध्ये चंद्र आणि शुक्राचा संयोग चढत्या घरात झाला आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होणार आहे. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. तुम्ही सर्जनशील पद्धतीने काम कराल. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या काळात करू शकता.


मकर रास (Makar Zodiac)


या राशीमध्ये दशम भावात कलात्मक योग तयार झाला आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही अनुकूल परिणाम मिळतील. करिअरची सुरुवात चांगली होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. वैवाहिक जीवनातही आनंद राहणार आहे. मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )