Kedar Yog In Kundli: ज्योतिष शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा राजयोग देखील तयार होतात. असाच एक केदार राजयोग असून हा अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो, असं मानलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वेळी तब्बल 500 वर्षांनी हा राजयोग तयार होतोय. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहे. यावेळी कुटुंबात असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत. तसंच या राशींना संपत्ती मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या राजयोगाचा लाभ मिळणार आहे. 


तूळ रास (Tula Zodiac)


केदार राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्ही लोकप्रिय होऊ शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही तुमचे पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत लाभ मिळवू शकता. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकणार आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असणार आहे.


मिथुन रास (Mithun Zodiac)


केदार राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. अविवाहित आहेत त्यांना नातेसंबंधाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.  नोकरदार लोकांना नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि भौतिक सुखसोयी देखील वाढतील. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. 


मेष रास (Aries Zodiac)


केदार राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहेत. जे बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला उत्पन्नाच्या इतर स्रोतांची माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही चांगला नफा मिळणार आहे. तुमची व्यवसायाची विश्वासार्हताही वाढणार आहे. मोठ्या व्यावसायिक करारावरही स्वाक्षरी करू शकता. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )