Kedar Yog: 500 वर्षांनी 4 ग्रहांनी तयार केला केदार योग; `या` राशींना धनलाभाची दाट शक्यता
Kedar Yog : केदार राजयोगाची स्थापना 500 वर्षांनंतर झाली आहे. कारण यावेळी 7 ग्रह चार राशींमध्ये आले आहेत. त्यामुळे केदार योग तयार होतो.
Kedar Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. तसंच या योगांचा प्रभाव काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो. अशातच आता एक राजयोग तया झाला आहे.
केदार राजयोगाची स्थापना 500 वर्षांनंतर झाली आहे. कारण यावेळी 7 ग्रह चार राशींमध्ये आले आहेत. त्यामुळे केदार योग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास (Aries Zodiac)
केदार राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण मंगळ, शुक्र आणि बुध तुमच्या राशीच्या भाग्यशाली स्थानात स्थित आहेत. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. नवीन कामातही यश मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी केदार राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकणार आहे. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. नवीन कामातही यश मिळेल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर पैसे कमावण्याचे नवीन मार्ग उघडणार आहेत.
तूळ रास (Tula Zodiac)
केदार राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. खेळाडू असाल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळू शकणार आहे. इतरांशी बोलताना थोडा संयम ठेवा. तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)