मुंबई : स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान आहे कारण येथे अन्नपूर्णा वास करते. ज्यामुळे लोकांना भरपेट जेवण मिळते. अन्नासाठीच आपण मेहनत करतो आणि असं म्हणतात की, आई अन्नपूर्णा प्रसन्न असेल, तर घरात कधीही कोणतीही समस्या येत नाही. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण जर आपण अन्नपूर्णाला दुखवणारी गोष्ट केली, तर त्यामुळे ती नाराज होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरात काळजी घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. ती बनवताना कोणत्या चूका करु नये, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


चपाती लाटताना या चुका करु नका


बऱ्याच वेळा घाईघाईत चपाती लाटताना त्याच्या पोलपाटाचा आवाज येऊ लागतो. तसेच पोलपाट नीट ठेवलं नाही तरी देखील चपाती लाटताना त्याचा आवाज येतो. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार चपाती लाटताना असं आवाज करणं अशुभ आहे. यामुळे धनहानी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


त्यामुळे चपाती लाटताना लक्षात ठेवा की, चुकूनही पोलपाटाचा आवाज येऊ देऊ नका. जर पोलपाट आवाज करत असेल, तर त्याखाली एक कापड ठेवा जेणेकरुन त्यामधून आवाज येणार नाही.


चपाती सर्व्ह करताना काळजी घ्या


चपाती सर्व्ह करतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा तुमचं मोठं नुकसान करू शकतो. लक्षात ठेवा की कोणाच्या ताटात तीन चपात्या कधीही देऊ नयेत. ते अशुभ मानलं जातं. याशिवाय चपाती दुसऱ्याला देताना सरळ हाताने उचलून देऊ नका, चपाती देण्यासाठी प्लेटचा वापर करा. कारण अनेकदा लोक घाईघाईत हाताने रोटी सर्व्ह करतात, जे चुकीचे आहे.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)