मेष - रोजच्यापेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलात तर यशस्वी व्हालं. कामाचा ताण असेल. महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष द्या. व्यवसायातील समस्या समजुतीने सोडवाल. यश मिळेल. प्रवास होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - तुमचा सल्ला ऐकून अनेकजण प्रभावीत होतील. जुन्या समस्या मार्गी लागतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. मित्रांची मदत मिळेल. कामात व्यस्त राहाल. 


मिथुन - रोजची काम संपवण्यासाठी आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, त्याचा विचार करुन त्याकडे अधिक लक्ष द्या. कामाकडे लक्षकेंद्रीत करा. 



कर्क - निर्णय घेताना सावधपणे घ्या. इतरांचा तुमच्यावर दबाव येऊ देऊ नका. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम केल्यास तर अनेक काम स्वत:हून मार्गी लागतील. आज तब्बेतीकडे दुर्लक्ष करु नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


सिंह - पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये यश मिळेल. कामात जवळच्या व्यक्तीची मदत होऊ शकते. आनंदी राहाल. महत्वाकांक्षा वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहील. 


कन्या - दिवस चांगला आहे. विचार करत असलेल्या कामात यश मिळेल. जोडीदारासोबत वाद घालू नका. कौटुंबिक समस्या सुटतील. कामं वेळेत पूर्ण होतील.


तुळ -  विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करा. दिवस चांगला आहे. धनलाभ होऊ शकतो. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम कराल. जोडीदाराकडून खास प्रेम मिळेल. कामत लक्ष लागेल. संयम ठेवावा लागेल.


वृश्चिक - नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये फायदा होणाऱ्या गोष्टी समोर येतील. खूप सारी काम सहज पूर्ण होतील.


धनु  - दिवस चांगला असेल. विचार करुन मगच पुढे जा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. उत्साही राहाल. नवीन लोकांशी ओळखी होतील. नवीन योजना आखू शकता. 


मकर - वायफळ खर्च होऊ शकतो. मनातील सर्वच गोष्टी सर्वांशी शेअर करु नका. रखडलेली काम पूर्ण करा, नवीन कामाची सुरुवात करणं टाळा. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 


कुंभ - पैशांसंबंधी चिंता राहील. दररोजच्या कामात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अडचणीतून स्वत:ला सावरावं लागेल. अचानक कोणती चांगली बातमी येईल.


मीन - खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रवासाचा योग आहे. तब्येत चांगली राहील. घरातील वातावरण चांगलं राहील. मित्र आणि परिवाराची मदत मिळेल.