Diwali Kali Haldi Upay: दिवाळी सणाला अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. घरोघरी फराळ, कंदील आणि रांगोळीची रेलचेल सुरु आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर काही तोडगे आणि उपाय प्रभावी ठरतात. या दिवसी तंत्र-मंत्र सिद्धीसाठी काही उपाय केले जातात. दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काळ्या हळदीचा तोडगा प्रभावी सिद्ध होतो. ज्योतिषशास्त्रात काळ्या हळदीचा वापर प्रभावी तोडग्यासाठी केला जातो. चला तर जाणून घेऊयात काळ्या हळदीचा चमत्कारी उपाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-घरात आर्थिक अडचण असेल तर काळ्या हळदीचा तोडगा प्रभावी ठरु शकतो. दिवाळीच्या दिवशी पिवळ्या कपड्यात काळी हळद आणि एक चांदीचे नाणे ठेवा. यानंतर पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहील.


-कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर आणि सिंदूर ठेवा. ही डबी देवी लक्ष्मीच्या चरणी स्पर्श करा. यानंतर ही डबी तुम्ही तिजोरीत ठेवा. या तोडग्यामुळे आर्थिक चणचण दूर होते.


-व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर काळी हळद वाटून त्यात गंगाजल मिसळा. शुक्ल पक्षातील बुधवारी व्यवसायात वापरल्या जाणार्‍या मशीनवर स्वस्तिक काढा, यामुळे विशेष लाभ होतो. यामुळे व्यक्तीची व्यवसायात प्रगती होते.


Shani Margi 2022: तीन दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, 3 महिने या राशींची असेल चांदी


-चांगला पैसा कमवूनही हातात टिकत नसेल तर काळ्या हळदीचा उपाय प्रभावी ठरू शकतो. गुरु-पुष्यामृत योग असेल त्या दिवशी काळी हळद सिंदूरात ठेवा आणि लाल कपड्यात गुंडाळा. त्यात काही नाणी टाकून धूप-दीप दाखवून तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.