Lunar Eclipse in 2021: या वर्षातील सर्वात शेवटचं चंद्रग्रहण, या राशीवर होणार मोठा परिणाम
चंद्रग्रहणाचा राशीवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या
मुंबई: असं म्हणतात की चंद्रग्रहण काही राशींसाठी चांगलं नसतं. तर काही राशींसाठी शुभ असतं. या चंद्रग्रहणाचा कुंडलीवरही परिणाम होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक प्रकारचे ग्रहण अशुभ मानले जाते. ग्रहण दरम्यान, सर्व प्राणी आणि माणसांवरही नकारात्मक प्रभाव पडतो असं म्हटलं जातं. चंद्रग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये असं वडिलधाऱ्या व्यक्ती सांगतात.
2021 मध्ये पहिले चंद्रग्रहण 26 मे 2021 रोजी झाले आणि 2021 चे शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण अंशतः दृश्यमान असेल जे भारत, अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर भागात दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळचे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देश आणि जगासाठी काही राशींसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
या ग्रहणाचा कोणत्या राशीवर पडणार प्रभाव
या ग्रहणाचा वृषभ राशीवर मोठा परिणाम होणार आहे. अनेक समस्या आपल्याला येण्याची शक्यता आहे. याचा सूतककाळ लागणार नसला तरी वृषभ राशीसाठी हे ग्रहण अडचणी घेऊन येणारं ठरणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक असणार आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सकाळी 11.34 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5.33 ला संपणार आहे. भारताव्यतिरिक्त ते अमेरिका, उत्तर युरोप, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागरातही पाहिले जाऊ शकते.
ग्रहण काळात शुभ कार्य करू नका
धार्मिक अभ्यासकांच्या मते ग्रहण लागल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करु नये. तसेच, ग्रहण वेळी मंदिरे आणि घरात पूजा करणे देखील निषीद्ध आहे आणि जेव्हा ग्रहण संपेल तेव्हा स्वच्छतेचा नियमही आहे. ग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.