Mahakedar Rajyog : तब्बल 20 वर्षांनी बनतोय `महाकेदार राजयोग`; `या` राशींचं नशीब फळफळणार
Mahakedar Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो.
Mahakedar Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशी राशी बदलाला गोचर म्हणतात. ग्रहांच्या गोचरचा परिणाम हा राशींच्या जीवनावर होताना दिसतो. दरम्यान काही ग्रहांच्या राशी बदलावेळी काही योग तयार होतात. असाच आता तब्बल 20 वर्षांनी महाकेदार योग तयार होणार आहे.
केदार योग हा भाग्यवान व्यक्तींच्या राशीत असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी या काळात अचानक आर्थिक लाभ निर्माण करणार आहे. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
या राशीच्या व्यक्तींसाठी महाकेदार राजयोग अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही काळ मानसिक तणाव कमी होणार आहे. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग देखील द्वितीय भावात तयार होतोय. या काळात लोक तुमच्या मधुर वाणीने प्रभावित होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे.
कर्क रास
या राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग चांगले दिवस घेऊन येणार आहे. हा काळ तुम्हाला मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करून नफा मिळू शकतो. राजकारणात असलेल्या लोकांना मान-सन्मान मिळेल. रिअल इस्टेटशी संबंधित असलेल्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळू शकणार आहे.
मकर रास
या राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये महागड्या आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळेल. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. व्यावसायिक लोक चांगली काम करतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी देणार्या लोकांना बढती मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )