Mahashivratri Puja Vidhi : आज महाशिवरात्री. देशभरात भक्तांमध्ये आज उत्साह आहे. शहरातील शंकराच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी केली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील लढाई आणि सकंट हे वेगवेगळी असतात. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष नाहीसे करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या हातात पैसा खेळावा आणि तुमच्यावरील संकट नाहीस व्हावं असं जर तुम्हाला वाटतं असले तर आज तुमचा रासीनुसार भोलेनाथाची पूजा करा. 


पूजा पद्धत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम जल अर्पण करावे, नंतर दुधाने अभिषेक करून त्यानंतर मध, तूप, दही इत्यादी विविध पदार्थांनी अभिषेक करावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही पदार्थाचा अभिषेक केल्यानंतर पाण्याने अभिषेक करणे अनिवार्य आहे. त्यानंतर बेलपत्र, फुले, हार, सुगंध आणि भोग अर्पण करावे.  (mahashivratri 2023 Bholenath according to the zodiac sign money will stay in the house throughout the year and troubles will stay away in marathi )


राशीनुसार पूजा करा


फक्त एक ग्लास पाणी अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात, परंतु जर लोकांनी सामग्री अर्पण करताना त्यांच्या राशीनुसार पूजा केली तर त्यांना मिळणारे फळ अनेक पटीने वाढते, चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या पदार्थाने पूजा करावी. 


मेष  (Aries)


जव आणि दुधाने भगवान शिवाची पूजा करणे मेष राशीच्या लोकांसाठी अधिक फलदायी असते. 


वृषभ  (Taurus)


 या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची फुले आणि काळ्या तिळाची पूजा करावी. असं केल्याने त्यांना इच्छित फळ मिळतं. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगाची पूजा मध आणि तिळाने करावी. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांनी पांढर्‍या तीळाची पूजा करावी. 


सिंह  (Leo)


सिंह राशीच्या लोकांनी भोलेनाथला गूळ आणि फुले अर्पण केल्यास त्यांचे कल्याण होईल. ,


कन्या  (Virgo)


या राशीच्या लोकांनी महादेवाला मधाचा अभिषेक करणे अधिक फायदेशीर आहे. 


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांनी साखरेची पूजा करावी.


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांनी गायीच्या दुधाने शिवशंकराची पूजा करावी.


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांनी भगवान शंकराला पांढरे तीळ अवश्य अर्पण करावेत. 


मकर (Capricorn)


 या राशीच्या लोकांनी काळ्या तीळाची पूजा करावी.


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांनी जव आणि तीळाची पूजा करावी.


मीन (Pisces)


 मीन राशीच्या लोकांनी जव, फुले आणि काळे तीळ देऊन पूजा करावी.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)