Maha Shivratri 2023 Date :  वर्षातून दोन वेळा येणारी महाशिवरात्रीपैकी फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदा महाशिवरात्री कधी साजरी करणायची आहे असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे.  या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असं म्हणतात की मंदिरातील प्रत्येक शिवलिंगांमध्ये भगवान शिव वास करतात. शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान शिव आणि माता पार्वतीची यथायोग्य पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 


महाशिवरात्री 2023 तारीख  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू कॅलेंडरनुसार, चतुर्दशी तिथी 17 फेब्रुवारी 2023 ला रात्री 8:02 पासून सुरू होईल आणि 18 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 4:18 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार 18 फेब्रुवारी 2023 (18 February 2023) म्हणजे शनिवारी महाशिवरात्री साजरी होणार आहे.  (mahashivratri 2023 date 18 February 2023 Shubh Muhurta Pooja Timings puja vidhi Mantra health wealth and money marathi news)


महाशिवरात्रीला चारही प्रहरात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त (Maha Shivratri Pooja Timings)


रात्रीच्या पूजेची वेळ – 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.52 वाजेपासून ते रात्री 12.42 वाजेपर्यंत
पहिला प्रहर –  18 फेब्रुवारी 2023, सायंकाळी 6.40 वाजेपासून ते 9.46 वाजेपर्यंत
दुसरा प्रहर – रात्री 9.46 वाजेनंतर
तिसरा प्रहर – 19  फेब्रुवारी 2023, रात्री 12. 52 वाजेपासून ते  पहाटे 3.59 वाजेपर्यंत
चौथा प्रहर –19  फेब्रुवारी 2023,  पहाटे 3.39 वाजेपासून ते सकाळी 7:05 वाजेपर्यंत


पारायण करण्याचा शुभ मुहूर्त


महाशिवरात्री व्रताच्या पारणाची वेळ 19 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 6.57 ते दुपारी 3.33 अशी असेल.


महाशिवरात्री व्रत आणि पूजा विधी


या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून आपल्या शक्तीनुसार निर्जल किंवा निष्फळ व्रत करावे. या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना पहिल्यांदा जल, मग पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावा. अभिषेकानंतर पांढरे चंदन लावून बेलपत्र, धतुरा, शमी, मदार, अत्तर, जनेयू भगवान शंकराला अर्पण करावं. यानंतर कुटुंबासमवेत भोग अर्पण करून आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. या दिवशी प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार शंकराच्या पिंडीवर बेलचे पान अपर्ण करतो. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्वं असतं. 


महाशिवरात्रीला 'या' मंत्रांचा जप करा


महामृत्युंजय मंत्र


ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्


शिव गायत्री मंत्र


ओम तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्


पंचाक्षरी मंत्र


ओम नम: शिवाय


लघु मृत्युंजय मंत्र



ओम जूं स माम् पालय पालय स: जूं ओम


शिव आरोग्य मंत्र


माम् भयात् सवतो रक्ष श्रियम् सर्वदा
आरोग्य देही में देव देव, देव नमोस्तुते
ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्



'या' गोष्टी नक्की करा! (Take care of these things on Maha Shivratri)


1. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे.
2. त्यानंतर केसरच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावावा.
3. यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा.
4. भगवान शंकराला भांग, धतुरा, बेलपत्र, तुळस, जायफळ, कमळ गट्टे, पाच प्रकारची फळे, गोड सुपारी, उसाचा  रस, फुले आणि काही धन अर्पण करावे.
5. यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.
6. वरील गोष्टी अर्पण करताना ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय असा जप करावा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)