Mahashivratri 2023 : शिवभक्तांचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री...यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. देशभरात आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भोलेनाथाच्या मंदिरात पूजाअर्चेसाठी शिवभक्तांनी एकच गर्दी केली आहे. पण ही पूजा अर्चा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी अन्यथा तुमच्या पूजचं फळ मिळतं नाही. कारण अनेक भक्तांकडून या चुका होतात. प्रेम, शक्ती आणि एकात्मतेचे मूर्तिमंत रूप म्हणून शिव आणि शक्ती यांची पूजा केली जाते. म्हणून ही पूजा करताना चुकूनही या गोष्टी करु नका आणि या गोष्टींची काळजी घ्या.  (Mahashivratri 2023 Dont do these things in Mahashivratri Puja and do these things Mahashivratri Puja and Chant these mantras according to the zodiac sign astro tips in marathi)


महाशिवरात्रीच्या पूजेत काय करावे?


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर झोपून राहू नका. 

  • महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करुन पांढरे, लाल, पिवळे आणि केशरी रंगाचे कपडे परिधान करा. 

  • 'ॐ नमः शिवाय'  या मंत्राचा जप करा.  

  • महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणून भक्त शिवपूजा करण्यापूर्वी संध्याकाळी स्नान करतात.

  • शिवाच्या पूजेमध्ये दूध, धतुर्‍याची फुले, बेलपत्र, चंदनाची पेस्ट, दही, मध, तूप आणि साखर इत्यादींचा प्रसाद दिला जातो. 

  • व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी भाविक पहाटेपासून चतुर्दशी तिथीच्या समाप्तीदरम्यान उपवास सोडावा. 

  • धतुर्‍याचे फूल किंवा पांढर्‍या रंगाचे फूल अर्पण करणे खूप शुभ असते.


महाशिवरात्रीच्या पूजेत काय करू नये?


  1. जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केला असेल तर तांदूळ, गहू किंवा डाळीचं सेवन करु नका. 

  2. महाशिवरात्रीच्या दिवशी लसूण, कांदा आणि मांसाहार कधीही खाऊ नये.

  3. शिवलिंगावर नारळ जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जात नाही.

  4.  कमळ आणि लाल रंगाची फुलं अर्पण करू नका. 

  5. शंखातून पाणी अर्पण करू नये.

  6. लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याने अभिषेक करू नका

  7. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करणे शुभ मानले जाते.

  8. काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करू नये.


राशीनुसार 'या' मंत्रांचा जप करा


मेष - ॐ पार्वतीपतये नमः 
वृषभ - ॐ त्रिनेत्राय नम:
कर्क - ॐ नमो भगवते रुद्राय नमः
सिंह - ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् 
कन्या - ऊं नमः शिवाय
तुला - ॐ ज्ञानभूताय नम:
वृश्चिक -  ऊं व्योमात्मने नम: 
धनु - ॐ ईशानाय नम:
मकर -ॐ श्रीकंठाय नम:
कुंभ - ॐ अनंतधर्माय नम:
मीन - ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)