Mahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा `हा` उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!
Mahashivratri Upay: शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) मानलं जातं.
MahaShivratri Upay : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivaratri 2023) हा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी (Mahashivratri 2023 Date) रोजी आहे. या वर्षीच्या महाशिवरात्रीला महान योग (Mahashivratri Auspecious Yoga) घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलं आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने शंकराची उपासना केली जाते. काही ठिकाणी कडक उपास केला जातो तर काही ठिकाणी अन्नदान केलं जातं. (Mahashivratri 2023 Vrat Date Muhurat Shani Pradosh Puja Yoga Shani Dosh Upay Zodiac Sign Astro Tips)
शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) मानलं जातं. मागील 23 ऑक्टोबरला शनिदेव मकर राशीत (Capricorn) मार्गस्त झालेत. त्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव दिसून येतोय.
प्रदोष व्रत आणि शिवरात्री दोन्ही गोष्टी शिवाला अतिशय प्रिय आहेत. दुसरीकडे या वर्षी महाशिवरात्रीला शनिदेव कुंभ राशीत (Aquarius) विराजमान होणार आहेत. या दोन्ही संयोगाने शनिदेवाची उपासना (Mahashivratri shani puja sanyog) करणार्याला ऐश्वर्य, समृद्धी आणि समृद्धी प्राप्त होते, असं म्हटलं जातंय.
महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय (Mahashivratri shani upay)
शिवाला शनिदेवाचे गुरु मानलं जातं. महाशिवरात्री आणि शनि प्रदोष व्रत यांच्या संयोगाने शनि-शिवाची उपासना केल्यानं कुंडलीतील शनिदोष दूर होईल. शनीला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर (Mahashivratri 2023 Puja) शमीपत्र अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे शनि महादशा, साडेसातीपासून मुक्ती मिळेल, असं मानलं जातं.
शिवलिंगावर (Mahashivratri Pooja upay) देवाला बेलपत्र आणि शमीचे फूल अर्पण करा. असे मानले जाते की शनिदोषाचा नकारात्मक प्रभाव लवकरच नाहीसा होईल.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2023) दिवशी शिवालयातील भोलेनाथांना त्यांचे आवडतं शस्त्र त्रिशूल अर्पण करावं. त्यामुळे शनिशी संबंधित त्रास दूर होतात. विशेषत: काळी उडीद डाळ, काळे तीळ, मोहरीचे तेल या दिवशी दान केल्याने त्याचा फायदा होतो, असं मानलं जातं.