Famous Lord Shiva Temples in Maharashtra: चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांमध्ये शिवशंकराचा वास आहे असल्याचं हिंदू पुराणात सांगितलं जातं, मात्र महाराष्ट्रातील काही कुळांचं कुलदैवत दैवत हे शिवशंकराचा अवतार असल्याचे पहायला मिळतं. शिवाच्या अवतारातील या देवस्थानांची माहिती जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेजुरी 



येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करण्याऱ्या कोळी , धनगर, आणि आदी कुळांचा रक्षक असलेला हा खंडेराय आंध्रप्रदेशामध्ये मल्लिकार्जुन नावानं ओळखला जातो. त्यामुळे  महाराष्ट्र आणि सोबतच दाक्षिणात्य कुळांचं दैवत म्हणून जेजुरीच्या खंडेरायाला भाविक मोठ्या श्रद्धेने पुजतात.  जेजुरीच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गडावरील मंदिर हे दाक्षिणात्य कला प्रकारातील येतं. या मंदिराचं बांधकाम सोळाव्या शतकातील असल्यास सांगण्यात येतं.



 मल्ल या दैत्याची हार करणारा हा मार्तंड मल्हारी म्हणून ही ओळखला जातो. शिव आणि शक्ती यांचा अंश असल्याने या देवस्थानाला नवविवाहित जोडपं दर्शनासाठी येतं. चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्येला गटावर भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळते. देवाच्या जागरण गोंधळाला  खोबरं आणि भंडारा उधळण्याची प्रथा आहे. म्हणूनच खंडेरायाच्या या गडाला सोन्याची जेजुरी असंही म्हटलं जातं. 


म्हस्कोबा 



पुरंदर तालुका मंदिरांनी समृद्ध आहे. भैरवनाथाचा अवतार असलेला हा म्हस्कोबा स्मशानात अवतरला म्हणून याला म्हसकोबा असं म्हटलं जातं. पुणे सातारा दरम्यान सासवडच्या जवळ वीर या ठिकाणी श्री क्षेत्र म्हस्कोबा देवस्थान आहे., "सवाई सर्जाचं चांगभलं! चा नारा देत अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीपर्यंत पंधरा दिवस इथे म्हस्कोबाची जत्रा भरते. 



ज्योतिबा 



 करवीरनिवासिनी अंबाबाईसोबतच रांगड्या कोल्हापुराचं आराध्य दैवत म्हणून ज्योतिबाला ओळखलं जातं. शिवकाळातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा परिसरात ज्योतिबाचा डोंगर आहे.  कोल्हापुर,मध्यरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील अनेक कुळांचा दैवत म्हणून ज्योतिबाला पुजलं जातं. वैशाख आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमेला इथे मोठा उत्सव साजरा होतो. पावसाळ्यात ज्योतिबाचा डोंगरावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. 


 मंगेशी 



महाराष्ट्रापासून वेगळा झाला तरी कोकणाचा भाग असलेल्या गोव्यातील जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र  मंगेशी. शिवशंकराचा अवतार असलेलं हे देवस्थान गोवा आणि तळकोकणातील कुळांचं कुलदैवत मानलं जातं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं कुलदैवत हा गोव्याचा मंगेश आहे. या मंदिराच्या दिपस्तंभावरील शिल्पकलेने डोळ्याचं पारण फिटतं. पब, डीस्को , नाईटपार्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात मंगेशी सारखं शांत आणि अध्यात्मिक ठिकाण हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. 


 रवळनाथ 



तळकोकण आणि गोव्याच्या सीमेवरील गावांतील कोकणस्थांचं कुलदैवत हे रवळनाथ आहे. रवळनाथ हा शिवशंकराचा अवतार असल्याचं म्हटलं जातं. वेतोबा, रामेश्वर आणि कणकवली तालुक्यातील आशिये गावातील ग्रामदेवता म्हणून ओळखलं जाणारं गांगोभैरी हे तळकोकणातील कुळाचं दैवत मानलं जातं. कुळांचा रक्षणकर्ता रवळनाथाची जत्रा माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.