Mahashivratri Panchakshar Stotra 2023 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री (Mahashivratri 2023 ) हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह झाला. यावर्षी, महाशिवरात्रीचा (Mahashivratri ) उत्सव शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम आहे. यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी शनि ग्रह मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असेल. असा दुर्मिळ  योग 30 वर्षांनंतर घडत आहे. याशिवाय महाशिवरात्रीला अनेक शुभ योग बनत आहेत. या शुभ योगांमध्ये भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधि-विधानानुसार पूजा आणि मंत्रजप केल्यास भरपूर लाभ मिळतील. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर स्तोत्र पठण (Mahashivratri Panchakshar Stotra )केल्यास तुमची एकही इच्छा अपूर्ण राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार


पंचाक्षर स्तोत्राचे महत्व 


पंचाक्षर स्तोत्र पठण केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होऊन चांगला आर्शीवाद देतात. त्यांची तुमच्यावर कृपा राहते. तुमची सर्व संकट दूर होतील. पंचाक्षर स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्तीचा अकाली मृत्यू टळतो, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर पठण करणार्‍यांची सर्व दु:ख, संकटे दूर होतात. 


दरवर्षी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. याच दिवशी होणारी त्यांची भेट म्हणजे महाशिवरात्री होय. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने व्रत करणारा कोणताही भक्त विधीपूर्वक भोलेशंकराची पूजा करतो. शिवशंभो त्याला खूप आशीर्वाद देतात. तसेच दुर्मिळ योगामुळे काही राशींच्या लोकांचे दिवस चांगले येणार आहे. त्यांच्या भाग्योदय हा महाशिवरात्रीच्या दिवसापासून होणार आहे.


शिव पंचाक्षर स्तोत्र


नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥1॥


मंदाकिनीसलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वरप्रमथनाथ महेश्वराय।
मण्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नम:शिवाय॥2॥


शिवाय गौरीवदनाब्जवृन्दसूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्रीनीलकण्ठाय बृषध्वजाय तस्मै शिकाराय नम:शिवाय॥3॥


वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्यमुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नम:शिवाय॥4॥


यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नम:शिवाय॥5॥


 पञ्चाक्षरिमदं पुण्यं य: पठेच्छिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥6॥


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)