Mahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार

Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.

Updated: Feb 5, 2023, 03:39 PM IST
Mahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार

Mahashivratri 2023 Auspicious Yoga : महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri ) उत्सवाच्या दरम्यान, अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. यामुळे महाशिवरात्रीच्या दिवसापासून काही राशीच्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. दरवर्षी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. (Mahashivratri 2023 ) याच दिवशी होणारी त्यांची भेट म्हणजे महाशिवरात्री होय. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने व्रत करणारा कोणताही भक्त विधीपूर्वक भोलेशंकराची पूजा करतो. शिवशंभो त्याला खूप आशीर्वाद देतात. तसेच दुर्मिळ योगामुळे काही राशींच्या लोकांचे दिवस चांगले येणार आहे. त्यांच्या भाग्योदय हा महाशिवरात्रीच्या दिवसापासून होणार आहे.

शनी आणि सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार 

यंदाची महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला दुर्मिळ योग घडत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शनी आणि सूर्य दोघेही कुंभ राशीत प्रेवश करत आहेत. या दोघांच्या गोचरमुळे शुभ प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल. दुसरीकडे भोल्याशंकरांच्या कृपेने या लोकांच्या आनंदात अधिक भर पडेल. महाशिवरात्रीला करा 'या' स्तोत्राचे पठण, तुमच्या मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण !

या दिवशी कोणते उपाय कराल?

महाशिवरात्रीला अशा शिवलिंगाचा दुधाने अभिषेक करा. मात्र एक काम करावे लागेल. जिथे त्याची अनेक काळापासून पूजा केली जात नाही, तेथे हा अभिषेक करा. असे केल्याने पितृदोष, गृहदोष अशा अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. यावेळी शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करा. निशिता काळात शिवलिंगाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. 

शुभ प्रभाव

मेष - मेष राशींच्या लोकांवर शनी आणि सूर्याच्या गोचरचा शुभ प्रभाव राहील. या दिवशी भगवान भोलेनाथांच्या कृपेने व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात आशीर्वाद आणि समृद्धी असेल.

वृषभ - महाशिवरात्रीच्या दिवसापासून वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होतील. अशा स्थितीत या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा. या दिवशी भाग्य अधिक उजळून निघेल. तुमच्या हातात भरपूर पैसा येईल आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

कुंभ - शनी आणि सूर्य यांच्या गोचरने तयार होणारा एक दुर्मिळ संयोग कुंभ राशींच्या लोकांना हे मोठे यश दाखवेल. महाशिवरात्रीपासून या लोकांचे प्रत्येक काम पूर्ण होऊ लागेल. पैशाचे नवीन स्त्रोत सापडतील आणि अविवाहित लोकांचे लग्न जमण्याचा योग आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)