मुंबई : लाल धागा हातात घालण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की एखादे शुभ कार्य किंवा पूजा कथा वगैरे असेल तर त्यात लाल रंगाचा धागा किंवा कलावा बांधला जातो. कलावा हा तीन धाग्यांनी बनलेला असतो. त्यात लाल रंगाचे प्रमाण भरपूर असले तरी त्यात पिवळे आणि हिरवे किंवा पांढरे धागे देखील आहेत. हे तीन धागे त्रिशक्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार लाल रंगाचा धागा शुभ मानला जातो. लाल धागा धारण करण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले आहे. यासोबतच कोणत्या राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा घालू नये याचीही माहिती ज्योतिष शास्त्रात देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया लाल रंगाचा धागा धारण करण्याचे काय फायदे आहेत आणि कोणत्या राशीच्या लोकांनी ते घालणे टाळावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल धागा घालण्याचे फायदे
धार्मिक मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. यासोबतच हनुमानजींची कृपाही राहते.
मंगळाचा रंग लाल आहे, त्यामुळे लाल रंगाचा धागा बांधल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते. लाल रंगाचा धागा धारण केल्यानं आर्थिक लाभही होतो.


कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधायला हवा
ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा. दरम्यान, या राशीच्या लोकांना लाल धागा बांधून हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो. वास्तविक मंगळ आणि सूर्य देवाला लाल रंग प्रिय आहे, म्हणूनच या राशींचा स्वामी असल्यामुळे त्यांच्यासाठी लाल रंगाचा धागा शुभ असतो.


कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधू नये
ज्योतिष शास्त्रानुसार मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. यामुळेच शनिवारी शनिदेवाला काळी तीळ दान केली जाते. अशा परिस्थितीत या दोन राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा लाल रंगाचा कलावा घालू नये. याशिवाय मीन राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा घालू नये.


या दिवशी लाल धागा बांधावा
मंगळवारी लाल रंगाचा धागा धारण करावा. कलावा बांधल्याने ब्रह्माजींच्या कृपेने कीर्ती मिळते, विष्णूजींच्या कृपेनं रक्षा शक्ती आणि शिवाच्या कृपेनं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेनं धन, माता दुर्गेच्या कृपेने शक्ती आणि माता सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त होते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)