मुंबई : कलियुगात शनि हा सर्वात प्रबळ ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपामुळे केवळ मानवच नाही तर देवताही घाबरतात. ज्यावर शनीची वाईट नजर पडते, त्याला जीवनातील सर्व संकटांचा सामना करावा लागतो. भगवान शंकर स्वतः शनीच्या कोपापासून वाचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. शनिदेव जर कोपला असेल तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे त्रास देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार शनि अशुभ असेल तर या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी लवकर काही उपाय करावेत. शनिदेव ज्या व्यक्तीवर कोपले असेल त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती, मान-सन्मान, व्यवसाय नष्ट करतात. शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या व्यक्तीला सर्वत्र अपयशच मिळते. अशा स्थितीत 2021 मध्ये काही खास दिवस आहेत जेव्हा शनीचे उपाय केल्याने अनेक पटींनी जास्त फायदा होतो.


25 डिसेंबरला विशेष योग


आम्ही तुम्हाला सांगतो की 2021 च्या अखेरीस शनिदेवाला प्रसन्न करण्याची विशेष संधी सर्वांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत येत्या 25 डिसेंबर 2021 रोजी असा विशेष संयोग घडत आहे, ज्याद्वारे तुम्हाला शनीच्या प्रकोपापासून आराम मिळू शकतो. शनिवार, 25 डिसेंबर रोजी हा योग तयार होणार असून, यासोबतच पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीही या दिवशी होणार आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत राहणार आहे. सकाळी 11:23 पर्यंत प्रीति योग होत आहे. या दिवशी आयुष्मान योगही तयार होत आहे. हे शनिदेवाच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानले जातात. या दिवशी शनिदेवाची पूजा पूर्ण भक्तीभावाने केल्यास त्याचे फळ प्राप्त होते.


शनिदेवाला प्रसन्न करण्याचा हा उपाय


शनीची दशा तुमच्या जीवनात अशुभ असेल तर शनिदेवाला शांत करण्यासाठी 25 डिसेंबर शनिवारी हे सोपे उपाय केल्यास त्याच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळेल. विशेषत: शनिवारी शनि मंदिरात जाऊन देवाची पूजा करावी. लक्षात ठेवा, या काळात शनिदेवाच्या मूर्तीसमोर चुकूनही उभे राहू नये, मूर्तीच्या उजवीकडे किंवा डावीकडे थोडेसे उभे रहा. याशिवाय शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करून शनि मंत्र आणि शनि चालिसाचे पठण करावे. शनिशी संबंधित वस्तू गरीबांना दान करा.