Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! `या` राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा
Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.
Three Rajyog In Transit Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदल असतो. अशात येणाऱ्या मार्च महिन्यात ग्रहांच्या संक्रमणामुळे अतिशय शुभ असून तीन राजयोग काही राशींच्या लोकांचे नशिब फळफळणार आहे. कुंभ राशीत शनिदेवाच्या संक्रमणामुळे शश महापुरुष राजयोग, मंगळ गोचरमुळे रुचक राजयोग निर्माण झाला आहे. तर संपत्तीचा कारक शुक्र मार्च मीन राशती संक्रमण करणार आहे. शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. तब्बल 200 वर्षांनंतर हा राजयोग मार्च महिन्यात तयार होत असून शश महापुरुष राजयोग, रुचक राजयोग आणि मालव्य राजयोग काही राशींना अमाप संपत्ती देणार आहे. (malavya shash and ruchak Rajyog after 200 years in March These zodiac signs will get immense money and prestige)
मकर रास (Capricorn Zodiac)
3 राजयोगामुळे या राशीच्या लोकांना अतिशय फायदा होणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसा मिळणार आहे. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून तुमच्यावरील कर्जाच बोझ उतरणार आहे. यावेळी तुम्ही काही मालमत्ता देखील खरेदी करणार आहात. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या कारणास्तव प्रवास करणार असाल तर त्यातून तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
3 राजयोगांमुळे या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती दिसून येणार आहे. तसंच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहे. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा वाढ होणार आहे. तसंच या राजयोगाच्या निर्मितीमुळे, व्यवसाय चांगला चालणार असून तुमची संपत्ती वाढ होणार आहे. तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी अनेक सुवर्ण संधी मिळणार आहेत. मित्रांसोबत लांब पल्ल्याच्या सहलीला जाणार आहात. नशीब तुमच्या बाजूने असल्याने संपत्तीत वाढ होणार असून तुमचं बँक बॅलन्सही वाढणार आहे. तसंच, जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहे.
मिथुन रास (Gemini Zodiac)
3 राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. त्यामुळे यावेळी मेहनतीसोबत नशीबही पूर्णपणे साथ तुम्हाला मिळणार आहे. करिअरच्या प्रगतीसाठी तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळणार असून त्याच तुम्ही सोनं करा. यावेळी तुम्ही देश-विदेशात सहलीलाही जाऊ शकता. त्याच वेळी, व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळणार आहे. त्या ठिकाणी मोठी बिझनेस डील फायनल होणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा जबरदस्त फायदा होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)