Malika Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. व्यवसाय, बुद्धिमत्ता, संस्कृती आणि सामाजिक घटनांमुळे बुधाने स्वतःच्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश केला आहे. 14 जून ते 29 जून बुध मिथुन राशीत असणार आहे. मिथुन राशीत बुध ग्रहाच्या आगमनामुळे अनेक राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज म्हणजेच ग्रहांचा राजा सूर्यही 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तर बुधाच्या गोचरमुळे बुधादित्य योगासह भद्र योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार झाले आहेत. यासोबतच सर्व ग्रह एकाच रेषेत आल्याने मलिका राजयोगही तयार होतोय. शुक्र, बुध आणि सूर्य मिथुन राशीमध्ये आहेत. यासोबतच शनी कुंभ राशीत, केतू मीन राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ मेष राशीत आणि गुरु वृषभ राशीत आहे. यामुळे मलिका योग तयार झाला असून या योगामुळे काही व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे. 


मेष रास (Mesh Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी मलिका योग खूप फायदेशीर ठरू शकतो. उच्च शिक्षणासाठी हा काळ खूप चांगला असू शकतो. जोडीदारासोबत नवीन काम सुरू करायचे असेल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. नोकरीतही फायदा होईल. जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी मलिका योग देखील चांगला मानला जातो. समाजात मान-सन्मान वाढेल. वकील, सेल्स मार्केटिंग, फंडिंग इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळतील. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाची आणि बोलण्याच्या कौशल्याची प्रशंसा होईल. 


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळणार आहे. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आरोग्यही चांगले राहील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकतो. तुम्ही आता आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळवू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )