Mangal Asta in Kanya Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतो. याचप्रमाणे काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. आगामी काळात  मंगळ ग्रहाचा अस्त होणार आहे. मंगळ ग्रह हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. सध्या मंगळ बुधच्या कन्या राशीमध्ये विराजमान आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीत मंगळ ग्रहण झाल्यामुळे तो शक्तिहीन होऊ शकतो. यावेळी काही राशीच्या लोकांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना मंगळाच्या अस्तामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. 


मेष रास (Mesh Zodiac)


या राशीमध्ये मंगळ सहाव्या भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. या काळात तुमच्या आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नोकरीत इतर सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अचानक भरपूर पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनीही थोडे सावध राहणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. 


कर्क रास ( Cancer Zodiac)


या राशीत मंगळ ग्रह तिसऱ्या भावात अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनीही थोडं सावध राहणं आवश्यक आहे. तुमचे सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य मिळणार नाही. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बिझनेस आणि नोकरीमध्ये अपयशासोबतच अडचणी येऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमची नोकरीही गमवावी लागू शकते. धनहानी होऊ शकते.


सिंह रास (Leo Zodiac)


या राशीच्या लोकांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना अपयशाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घरात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही नुकसान सहन करावे लागू शकते. कायदेशीर समस्या आणि आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )