मुंबई : कोणत्याही ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण हे 12 राशींवर प्रभाव पाडणारं असतं. काही राशींवर चांगला तर काही राशींवर त्याचा वाईट परिणाम होत असतो. 27 जून रोजी मंगळ ग्रह आपल्या स्वराशीत प्रवेश करत आहे. मेष राशीत प्रवेश करत असल्याने त्याचा परिणाम 12 राशींवर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीमध्ये राहु विराजमान आहे. त्यामध्ये आता मंगळ येणार आहे. हा ग्रह दीड महिना या राशीत असणार आहे. 10 ऑगस्टला मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. 


ज्योतिश शास्त्रानुसार राहु आणि मंगळ एका राशीत असणं म्हणजे हा अंगारक योग आहे. हा अंगारक योग अशुभ असतो. त्यामुळे 4 राशीच्या लोकांना दीड महिना सांभाळून राहावं लागणार आहे. त्यांना अनेक संकटं, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


वृषभ- या राशीच्या व्यक्तींना 45 दिवस शत्रूंपासून सावध राहावं लागणार आहे. खर्चात मोठी वाढ होऊ शकते. याचा परिणाम बजेटवर होईल. भावंडांमध्ये भांडणे होऊ शकतात. अशा परिस्थितीत बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे. वेळेअभावी व्यवसायात व्यवहार करणे टाळा. या दरम्यान हनुमान चालीसा पठण करणं आवश्यक आहे.


सिंह- प्रवासात नशीब तुम्हाला साथ देणार नाही. जर तुम्ही व्यवसायात मोठे व्यवहार करत असाल तर त्यात अडथळे येऊ शकतात. त्याचबरोबर परदेश दौऱ्यावर जाणेही रद्द केले जाऊ शकते. या काळात वाहन जपून चालवा. बाहेरचे खाणे टाळा. 


तुळ- हे उच्च शिक्षण आणि प्रेमविवाहात अडथळे आणू शकतात. या काळात कुटुंबात भांडणे आणि वाद वाढू शकतात. कोणत्याही कामात अडथळा आला तरी संयम राखा. घाईनं निर्णय घेणं धोक्याचं ठरू शकतं.


मकर-आरोग्याची काळजी घ्या. अचानक मोठे खर्च येतील त्यामुळे ताण वाढेल. मेहनत करूनही फळ मिळणार नाही. तुमच्या रागामुळे आणखी अडचणी वाढतील. भांडण झालं तरी रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.